BJP Leader Niranjan Davkhare Questions New Hospital Erection in Thane
BJP Leader Niranjan Davkhare Questions New Hospital Erection in Thane 
मुख्य बातम्या मोबाईल

रुग्णालये उभारण्याचा महापालिकेला विक्रम करायचाय का? निरंजन डावखरेंचा सवाल

सरकारनामा ब्युरो

ठाणे : ठाण्यातील ग्लोबल हबमध्ये उभारलेले एक हजार बेड्सचे विशेष कोव्हिड रुग्णालय अजूनही पूर्ण क्षमतेने सुरू झाले नसतानाच मुंब्रा व खारेगाव येथील प्रत्येकी ४०० बेडस् क्षमतेच्या रुग्णालयांपाठोपाठ व्होल्टास कंपनीच्या जागेवरही आणखी एक हजार बेड्सच् रुग्णालय उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे. ग्लोबल हबमधील रुग्णालयांसाठी अद्याप कर्मचारी वर्ग उपलब्ध झालेला नाही. अशा वेळी आणखी रुग्णालये उभारून ठाणे महापालिकेला कुठला विक्रम करायचा आहे काय, असा सवाल भाजपचे जिल्हाध्यक्ष व आमदार निरंजन डावखरे यांनी ट्वीटरच्या माध्यमातून उपस्थित केला आहे.

अगोदर रुग्णालयांसाठी आवश्‍यक कर्मचारी वर्गाची नियुक्त केल्यानंतरच  कोरोना रुग्णांसाठी नवी विशेष रुग्णालये उभारावीत, अशी सूचनाही आमदार डावखरे यांनी केली आहे. ग्लोबल इम्पॅक्‍ट हबमधील रुग्णालयांमध्ये पुरेसे डॉक्‍टर, परिचारिकांसह वैद्यकीय सेवेतील कर्मचारी उपलब्ध नाहीत. त्यामुळे आयसीयूसह संपूर्ण रुग्णालये पूर्ण क्षमतेने सुरू करता आलेली नाहीत. त्यातच महापालिकेने म्हाडामार्फत मुंब्रा येथे ४०६ व खारेगाव येथे ४३० बेड्सचे रुग्णालये उभारण्याबाबत कार्यवाही सुरू केली आहे.

स्टाफच्या नियुक्तीनंतरच रुग्णालये उभारा

पोखरण मार्ग क्रमांक २ येथील व्होल्टास कंपनीच्या जागेवरही सिडकोमार्फत १ हजार बेड्सचे रुग्णालय उभारण्याची घोषणा झाली. नव्या रुग्णालयांसाठी आता ठाणे महापालिकेनेच जाहिरात दिली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची नियुक्ती पूर्ण झाल्यानंतरच ही रुग्णालये सुरू केली जावीत, असे मत डावखरे यांनी व्यक्त केले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT