pravin24.jpg
pravin24.jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

राऊतांनी कधी कधी भाजपचंही कैातुक करावं...दरेकरांचा टोला 

सरकारनामा ब्युरो

मुंबई : "पुद्दुचेरीमध्ये काँग्रेसचे सरकार कोसळलं तर खासदार संजय राऊत टीका करतात पण, सांगलीबाबत ते सोयीची भूमिका घेतात. एका बाजूला काँग्रेसला जवळ घ्यायचं आणि दुसरीकडे काँग्रेसच्या अधःपतनाबाबत बोलायच..कधी कधी संजय राऊतांनी भाजपचंही कैातुक करावं," असा टोला विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी लगावला आहे.  

प्रवीण दरेकर म्हणाले की, काँग्रेसचे काउंनडाउन सुरू आहे. काँग्रेस असो की दुसरे पक्ष सगळीकडे पानिपत होतं आहे. माझ्या पक्षाशिवाय कुठल्याही पक्षात जनतेला विकास दिसत नाही. आम्ही बळकट आहोत. आम्हाला कोणी हलवू शकत नाही, असे ते सांगत आहेत. याचा अर्थ ते स्वतःच खिळखिळे होत आहेत. "एका बाजूला मुख्यमंत्री गर्दी करू नका, असे सांगतात, तर दुसरीकडे त्यांचाच मंत्री हजारोंच्या संख्येने देवीला उपस्थिती लावतो याचा अर्थ काय? 

राज्यात अंदाधुंदी माजली आहे. कायदा कोण पाळत नाही, जर मंत्री कायदा पाळत नाही तर जनतेने का पाळावा. कोणाचं नियंत्रण नाही. कोणाचा समन्वय नाही. कायद्याची कोणाला भीती नाही. मुख्यमंत्र्यांनी चांगल्या भावनेने नियम घातले आणि सरकारचाच मंत्री नियम पायदळी तुडवत आहे, तर कसा आवर घालणार," असा सवाल दरेकर यांनी उपस्थित केला आहे. "शरद पवार यांची हीच नाराजी आहे. पवारांच्या नाराजीचे कारण हे अत्यंत योग्य आहे. 'सरकारचा मंत्री माझ्यामागे समाज आहे,' ही ताकत दाखवण्याचा प्रयत्न करतोय. मग कोरोना आला तरी चालेल. कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी नक्कीच कारवाई झाली पाहिजे," असे दरेकर यांनी सांगितले. 

पूजा चव्हाण प्रकारणात तिच्या कुंटुबियांवर दबाब आणला जात आहे, असा आरोप दरेकर यांनी केला आहे. या प्रकरणातील अरूण राठोडच्या घरी चोरी झाली, त्याचा तपास करण्यात आलेला नाही, गर्भपात करून घेणारी पूजा अरूण राठोड ही महिला कुठे आहे, आदीं प्रश्न दरेकरांनी उपस्थित केले आहेत. पोहरादेवी येथे जमलेल्या दहा हजार जणांवर गुन्हा नोंद केला आहे, पण गर्दी जमविणाऱ्या मंत्र्यावर गुन्हा दाखल का केला नाही, अशी विचारणा दरेकरांनी केली आहे. 

 
हेही वाचा : डेलकरांच्या सुसाईड नोटमध्ये प्रफुल्ल पटेल यांचे नाव.. 

मुंबई : सातवेळा खासदार असणा-या मोहन डेलकर यांना इतके असहाय आणि विवश व्हावे लागले की त्यांनी आपले जीवनच संपवण्याचा निर्णय घेतला. गेल्या दीड वर्षापासून आपल्यावरील प्रचंड मोठ्या दबावाची आणि छळवणुकीची गाथा त्यांनी स्वतःच व्हिडीओद्वारे तसेच संसदेमध्ये भाषणातूनही मांडली होती. त्यांनी आपल्या व्हिडीओ संदेशात भाजप नेत्यांच्या नावाचा उल्लेख केला होता तसेच त्यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये भाजपचे गुजरातचे माजी मंत्री आणि सध्याचे दादरा नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल पटेल यांचे नाव घेतले आहे. यातूनच भाजपच्या त्रासाला कंटाळून खासदार मोहन डेलकर यांनी आत्महत्या केली असावी, असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.   

 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT