Pravin Darekar Ekanath Shinde Thane
Pravin Darekar Ekanath Shinde Thane 
मुख्य बातम्या मोबाईल

एकनाथ शिंदेंचे पंख तर छाटले जात नाहीयेत ना? दरेकरांनी व्यक्त केली शंका

विकास काटे

ठाणे :  ठाणे शहरातच नव्हे तर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून याला राज्य सरकार आणि स्थानिक महापालिकाच जबाबदार आहे. दरम्यान ठाणे जिल्ह्यात आयुक्त बदली मागे काहीतरी षडयंत्र असून वाढत्या कोरोनाला आळा घालण्यात अपयश आल्याचे वक्तव्य वक्तव्य राज्याचे विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी आज ठाण्यात केले. 

आज प्रवीण दरेकर यांनी ठाणे शहरात येऊन कोरोन्टीन सेंटर, नव्याने बनवण्यात आलेले कोविड रुग्णालयाची पाहणी केली. यावेळी विविध रुग्णांना होणार त्रास,अपुऱ्या सोयी सुविधा, तसेच खासगी रुग्णालयाकडून होणारी लूट याबद्धल प्रचंड नाराजी व्यक्त करत लवकरात लवकर यावर उपाययोजना ठाणे महापालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांनी करावी. अन्यथा भाजप रस्त्यावर उतरून या विरोधात तीव्र आंदोलन करेल, असा इशारा यावेळी दरेकर यांनी दिला. 

ठाणे जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा मृत्य होत आहेत. राज्य सरकार आणि अधिकारी यामध्ये समनव्य नाही. व्यवस्थेमुळे अनेक लोक मृत्यू पडत आहेत. ठाण्यात कोरोन्टीन सेन्टर उभे करण्या आले आहेत. मात्र डॉक्टर, नर्से नाहीत अशी देखील टीका दरेकर यांनी केली. कोरोनाच्या लढ्यासाठी मनुष्यबळ उभे करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. 

मुख्य सचिवांच्या खांद्यावर बंदूक ठेवून पालकमंत्री शिंदे यांचे पंख तर चाटले जात नाही ना, असा सवाल दरेकर यांनी उपस्थित केला आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आयुक्तांना आणले होते. मात्र काही महिन्यातच आयुक्तांची बदली करण्यात आली. मुख्य सचिवांच्या खांद्यावर बंदूक ठेवून पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे पंख छाटण्याचे उद्योग तर सुरू नाहीत ना, असा संशय मला वाटत असल्याचे ते यावेळी म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT