The BJP leader was kicked out of Shinde's Jana Aashirwad Yatra .jpg
The BJP leader was kicked out of Shinde's Jana Aashirwad Yatra .jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

जनआशीर्वाद यात्रेतून भाजपच्या बड्या नेत्याला धक्के मारून बाहेर काढले

Amol Jaybhaye

इंदूर : केंद्रीय मंत्र्यांच्या सध्या देशभरामध्ये जनआशीर्वाद यात्रा सुरु आहेत. यामध्ये महाराष्ट्रातीलही चार मंत्र्यांच्या यात्रा सुरु आहेत. नागरी उड्डाण केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Shinde) यांची देखील जनआशीर्वाद यात्रा सध्या सुरु आहे. त्याच्या यात्रेत सहभागी होण्यासाठी गेलेले पक्षाचे वरिष्ठ नेते गोविंद मालू (Govind Malu) यांना धक्के मारुन यात्रेच्या बाहेर काढण्यात आले आहे. (The BJP leader was kicked out of Shinde's Jana Aashirwad Yatra) 

मालू यांना पोलिसांनी धक्काबुक्की केली आणि त्यांना जनआशीर्वाद यात्रेत सहभागी होऊ दिले नाही. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. भाजपचे आमदार आकाश विजयवर्गीय यांच्या मतदारसंघात हा प्रकार घडला आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पोलिस कर्मचारी गर्दी नियंत्रणात आणत होते. त्याचवेळी भाजपचे वरिष्ठ नेते गोविंद मालू व्यासपीठाजवळ आले होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांना धक्के मारून बाहेर काढले. 

गोविंद मालू हे भाजपचे वरिष्ठ नेते आहेत. ते खनिज विकास परिषदेचे माजी उपाध्यक्ष आहेत. गोविंद मालू यांना धक्के देऊन बाहेर काढण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर काँग्रेसने त्यावरुन भाजपवर निशाणा साधला आहे. 

काँग्रेसने म्हटेल आहे की, इंदूर भाजपचे वरिष्ठ नेते गोविंद मालू यांना जनआशीर्वाद यात्रेतून बाहेर काढले. त्यांना पोलिसांनी धक्के दिले. गद्दारांची पूजा होतेय आणि निष्ठा धक्के खात आहेत, असा टोला काँग्रेसने लगावला आहे.    
 Edited By - Amol Jaybhaye 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT