Khadse- Bhole
Khadse- Bhole 
मुख्य बातम्या मोबाईल

भाजपच्या आंदोलनाला गर्दी जमविण्यासाठी नेत्यांची धावपळ

सरकारनामा ब्युरो

जळगाव : ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर शनिवारी भाजपचे राज्यभर चक्काजाम आंदोलन झाले. (BJP done agitaion on obc reservation issue in state) त्याचाच भाग म्हणून जळगावातही आंदोलन झाले. ‘भाजप’ पदाधिकारी आंदोलनासाठी जमले खरे; मात्र सुरवातीपासून दोन गटांत आंदोलन सुरू झाले. (Two groups in jalgaon BJP`s agitation) त्यामुळे या आंदोलनात सगळयाच पातळीवर विसंवाद होता. तिसऱ्याच ठिकाणी (They made agitation Third Differnt place)  आंदोलन झाल्याने कार्यकर्त्यांनी संयोजकांवर चांगलाच संताप व्यक्त केला.  

भाजपचे चक्का जाम आंदोलन उशीरा आंदोलन सुरू झाले, मात्र वाहनांची कोंडी होत नाही हे लक्षात येताच काही आंदोलक आकाशवाणी चौकातील मंदिराजवळील रस्त्यावर येऊन वाहने अडवू लागली. काही आंदोलक दुसऱ्या व तिसऱ्या रस्त्यावरील वाहने अडवू लागली. पोलिसांनी वाहतुकीची कोंडी होणार नाही याची दक्षता घेतली असल्याने अर्ध्या रस्त्यावर आंदोलन, तर अर्ध्या रस्त्यावरून वाहतूक सुरू असे चित्र होते. वाहतुकीची कोंडी आंदोलनात दिसावी म्हणून आंदोलकांनी आंदोलनाच्या चक्क तीन जागा बदलल्या.

शनिवारी भाजपच्या वतीने राज्यात ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन झाले. आंदोलनाचा भाग म्हणून जळगावातही भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते रस्त्यावर आले होते. स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसीचे आरक्षण टिकविण्यात राज्यातील महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरल्याचा आरोप या वेळी करण्यात आला. आकाशवाणी चौकात खासदार रक्षा खडसे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. जळगाव जिल्हा ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील, जळगाव महानगर अध्यक्ष दीपक सूर्यवंशी, ओबीसी मोर्चा जिल्हा महानगर अध्यक्ष जयेश भावसार, नगरसेवक कैलास सोनवणे, विशाल त्रिपाठी, दीपक साखरे, जिल्हा महानगरचे प्रदेश पदाधिकारी, नगरसेवक, मंडल अध्यक्ष, मंडल पदाधिकारी, शक्ती केंद्रप्रमुख उपस्थित होते.

...
राज्य सरकारने न्यायालयात स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसींच्या आरक्षणाबाबतचे कागदपत्रे वेळेवर सादर केली नाही. यामुळे न्यायालयाने ओबीसींचे आरक्षण रद्द केले आहे. जोपर्यंत राज्य शासन सर्व कागदपत्रे न्यायालयात सादर करून ओबीसींना आरक्षण मिळवून देत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहील.
-रक्षा खडसे, खासदार

--------
प्रत्येक तालुक्यात आंदोलन झाले. जनतेसाठी आंदोलन. सर्व समाजासाठी हे आंदोलन आहे. पक्षाच्या भूमिकेनुसार या समाजाला न्याय मिळाला नाही तर भविष्यात मंत्र्यांना फिरू देणार नाही. ५२ टक्के नाही तर सर्व जनतेवर अन्याय करते आहे. यापुढे तीव्र आंदोलन करू.
-सुरेश भोळे, आमदार 
...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT