J P Nadda - Narendra Modi.
J P Nadda - Narendra Modi. 
मुख्य बातम्या मोबाईल

भाजपच्या मिनी कार्यकारिणीत प्रदेशाध्यक्षांचे रिपोर्ट कार्ड तपासणार

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे पी नड्डा यांनी येत्या २१ फेब्रुावारीला बोलावलेल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या राष्ट्रीय बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी हजेरी लावणार आहेत. मात्र ते बैठकीला संबोधित करतील का याबाबत स्पष्टपणे सांगण्यात आलेले नाही.

येत्या २१ तारखेला (रविवारी) दिल्लीतील भाजप राष्ट्रीय मुख्यालयात बोलावण्यात आलेल्या बैठकीस देशभरातील कार्यालय पदाधिकारी, भाजप प्रदेशाध्यक्ष, संघटनमंत्री व राज्य सरचिटणीसांना बोलावण्यात आले असल्याने ही एका प्रकारे भाजपची "मीनी राष्ट्रीय कार्यकारिणीच' होणार आहे.

सकाळी ११ पासून सुरू होणाऱ्या या बैठकीत कृषी कायद्यांचे फायदे देशभरात पोहोचविण्यासाठी आणखी जोर लावण्याचे आवाहन पदाधिकाऱ्यांना करण्यात येईल असे सूत्रांनी सांगितले. त्याचबरोबर राज्याराज्यांतील संघटनात्मक कार्यक्रमांचाही आढावा यात घेण्यात येईल. प्रदेशाध्यक्षांना त्यांचे रिपोर्ट कार्ड आणण्यास सांगण्यात आले आहे. विशेषतः या वर्षात निवडणूक होणारया पश्‍चिम बंगाल, तमिळनाडू, आसाम आदी राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांवर विशएष जबाबदारी असेल हे स्पष्ट आहे. 

राष्ट्रीय कार्यकारिणीप्रमाणे यात रीतसर ठराव मंजूर होण्याची शक्‍यता नाही. तरीही कृषी कायद्यांबाबत एखादा प्रस्ताव मंजूर होण्याची शक्‍यता नाकरता येत नसल्याचे सूत्रांनी सांगितले. याआधी १४ फेब्रुावारीला ही बैठक होणार होती. मात्र संसद अधिवेशन १५ फेब्रुवारीपर्यंत होणार असल्याचे आधी जाहीर झाल्याने ही तारीख २१ फेब्रुवारी करण्यात आली.
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT