मुंबई : हिंदू विरोधी ठाकरे सरकार म्हणतेय होळी घराच्या दारा समोर पेटवायची नाही. तर मग काय घरात पेटवायची?असा सवाल भाजपचे आमदार राम कदम (Ram Kadam) यांनी सरकारला उद्देशून केला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने नवे नियम लागू केले आहेत. होळीच्या पार्श्वभूमीवर संयम राखून हा सण साजरा करण्याचे आवाहन सरकारने केले आहे. त्यावरुन राम कदम यांनी सरकारव टीका केली आहे. (BJP MLA Ram Kadam Targets Uddhav Thackeray over Holi Festival Restrictions)
''लोक रंगपंचमी समजू शकतात. कारण त्यावेळी गर्दी होईल. एकमेकांना स्पर्श होईल. मात्र नियमांचे पालन करत होळी (Holi) पेटवली आणि हिंदू बांधवांनी आपला सण साजरा केला तर त्याला ठाकरे सरकारचा विरोध का? सत्तेत आल्यापासून सातत्याने हिंदू धर्म (Hindu) आणि हिंदू सण यांना विरोध का ?अन्य धर्माना तातडीने परवानगी दिली जाते ते काय कोविडचे नातेवाईक लागतात काय?", असेही कदम यांनी ट्वीटद्वारे विचारले आहे
दरम्यान, महाराष्ट्रातील (Maharashtra( कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने नवी नियमावली जारी केली आहे. त्यानुसार १५ एप्रिलपर्यंत पुन्हा कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. पबमधली गर्दीमुळे कोरोना (Corona) वाढत असल्याचे लक्षात घेत आता रात्री ८ नंतर पाच जणांनी एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे. पब, मॉल आणि समुद्रकिनारे अशा सर्व ठिकाणी आता रात्री ८ ते सकाळी ८ वाजेपर्यंत एकत्र येता येणार नाही. (BJP MLA Ram Kadam Targets Uddhav Thackeray over Holi Festival Restrictions)
चित्रपटगृहे आणि नाट्यगृहांच्या वेळांवरही नियंत्रण आणण्यात आले आहे. १५ एप्रिलपर्यंत अटी लागू राहतील. रात्री आठनंतर हॉटेल बंद राहणार असून घरी पार्सल सेवा मात्र सुरू राहील. सार्वजनिक कार्यक्रम, राजकीय मेळावे आदींवर बंदी घालण्यात आली आहे. धार्मिक स्थळांमध्ये एका वेळेला किती व्यक्ती आत असाव्यात याचे नियम स्थानिक व्यवस्थापनाने तयार करावेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
Edited By - Amit Golwalkar
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.