4Mla_20Ram_20Satpute.jpg
4Mla_20Ram_20Satpute.jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

रेशनिंग दुकानावर दारू वाटायला पण ठाकरे सरकार मागे पुढे पाहणार नाही..भाजपचा टोला

सरकारनामा ब्युरो

पुणे :  अनेक दिवसांपासून चंद्रपूरमध्ये Chandrapurदारुबंदी करण्यात आली होती. मात्र, काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही बंदी उठवण्यात आली. या निर्णयावरुन भाजप नेत्यांची महाविकास आघाडी सरकारवर तोफ डागली आहे. माळशिरसचे आमदार राम सातपूते Ram Satpute यांनी टि्वट करीत ठाकरे सरकारला टोला लगावला आहे. bjp mla ram satpute slams maharash government liquor sale ban chandrapur

आमदार राम सातपुते आपल्या टि्वटमध्ये म्हणतात की, दारुबंदी  उठवून  गुन्हेगारी कमी होईल असा जावई  शोध या ठाकरे सरकारने लावला आहे . येत्या काळात रेशनिंग दुकानावर दारू वाटायला पण हे सरकार मागे पुढे पहाणार नाही ..! 

"संभाजीराजेंच्या मनात काय भलतच दिसतयं.." निलेश राणेंचा टोला
 
चंद्रपूरमधील दारुबंदी उठविण्याच्या निर्णयानंतर काँग्रेस नेते आणि मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले, “दारूबंदीनंतर चंद्रपूर जिल्ह्यात अवैध दारू विकली जात होती. दारूबंदी उठविण्यासाठी अडीच हजार निवेदने दिली होती. अवैध आणि निकृष्ट दर्जीची दारू जिल्ह्यात विकली जात होती. त्यामुळे दारूबंदीचे दुष्परिणाम दिसू लागले होते. यासंदर्भात एक समिती तयार करण्यात आली होती. या समितीने दारूबंदी उठवावी यासंदर्भात अहवाल दिला होता. हा अहवाल मंत्रिमंडळ बैठकीत ठेवला होता,” असे वडेट्टीवर म्हणाले. "दारूबंदीवर नियंत्रण ठेवणे शक्य नाही.." असे म्हणत त्यांनी सरकारच्या या निर्णयाचे समर्थन सुद्धा केले.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, हा चुकीचा निर्णय आहे. मग त्यांनी गेल्या ७ वर्षांपासून त्यांच्या नागपूर जिल्ह्यात का दारूबंदी केली नाही.  मागच्या सरकारमध्ये दारूबंदीचा घेतलेला निर्णय हा अतिशय घाईगडबडीत घेतला गेला होता आणि तो चुकीचा होता, असं मत कॉंग्रेसचे राज्यातील एकमेव खासदार बाळू धानोरकर यांनी व्यक्त केलं. राज्य सरकारच्या या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले आहे. 

भारतीय जनता पक्षाच्या सरकारने लोकांचे रोजगार हिरावून घेतले आहेत. हे लोक दरवर्षी २ कोटी लोकांना रोजगार उपलब्ध करून देणार होते. केंद्र सरकारने तशी घोषणाही केली होती. पण ते करू शकले नाहीत. त्यांच्या घोषणेप्रमाणे ७ वर्षांत १४ कोटी लोकांना रोजगार यांनी द्यायला पाहिजे होता, पण ते ही मंडळी करू शकले नाहीत. चंद्रपूर जिल्ह्यातील लोकांची रोजीरोटी सुरू होती, ती दारूबंदीच्या निर्णयाने या लोकांनी हिरावून घेतली. पण आता दारूबंदी उठवण्याचा जो निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, याचे सकारात्मक निकाल समोर येतील, असे खासदार धानोरकर  म्हणाले. 
Edited by : Mangesh Mahale  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT