BJP Solapur MP JaySiddheshwar Swamy Entered Polling Booth
BJP Solapur MP JaySiddheshwar Swamy Entered Polling Booth 
मुख्य बातम्या मोबाईल

सोलापूर भाजप खासदार सिद्धेश्वर स्वामी थेट घुसले मतदान केंद्रात (व्हिडिओ)

सरकारनामा ब्युरो

सोलापूर : शिक्षक आणि पदवीधर निवडणूक केंद्रात विना परवाना प्रवेश केल्या प्रकरणी सोलापूरचे भाजप खासदार जयसिध्देश्वर महास्वामी अडचणीत येण्याची शक्यता आहे .
विनापरवाना पंढरपूर येथील एका मतदान केंद्रात प्रवेश केला म्हणून त्यांच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करावा अशी मागणी शहर राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष संदीप मांडवे यांनी केली आहे.

आपण खासदार आहोत कोविडचे नियम पाळले   जातात कि नाही हे पाहण्यासाठी आणि मतदान किती टक्के झाले आहे याची माहिती घेण्यासाठी आपण मतदान केंद्रावर गेल्याचे खासदार जयसिध्देश्वर महास्वामी यांनी म्हटले आहे. जयसिद्धेश्वर स्वामी हे मतदान केंद्रातून बाहेर पडत असताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना हटकले. खासदारांना मतदान सुरु असताना बूथमध्ये जाण्याची परवानगी आहे, काय अशी विचारणा या कार्यकर्त्यांनी मतदान केंद्र प्रमुखाकडे केली. यावेळी काही काळा स्वामी व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाली.

दरम्यान, विधानपरिषदेच्या कालच्या निवडणुकीत ६९ टक्के मतदान झाले. अपेक्षेपेक्षा आणि विधानसभा निवडणुकीपेक्षा ते जास्त आहे. मात्र, सर्वाधिक मतदार असलेल्या पुणे पदवीधर मतदारसंघात ते सर्वात कमी झाले आहे. पदवीधरपेक्षा शिक्षक मतदासंघात मतदानाचा टक्का जास्त आहे. तीन पदवीधर, दोन शिक्षक आणि एक स्थानिक प्राधिकारी अशा सहा मतदारसंघांसाठी ही निवडणूक झाली. यामध्ये सायंकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी अंदाजे 69.08 टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली.

औरंगाबाद पदवीधर 61.08 टक्के, पुणे पदवीधर 50.30 टक्के, नागपूर पदवीधर 54.76 टक्के, अमरावती शिक्षक मतदारसंघ 82.91 टक्के, पुणे शिक्षक मतदारसंघ 70.44 टक्के तर धुळे-नंदुरबार स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात सुमारे 99.31 टक्के मतदान झाले आहे. पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील पाच जिल्ह्यात सर्वात कमी मतदान हे सर्वात जास्त मतदार आणि बुद्धिजीवींच्या शहराचा (पुणे)समावेश असलेल्या पुणे जिल्ह्यात झाले. तेथे पदवीधरला ४४ ८७, तर शिक्षकसाठी ५८.४३ मतदान झाले. सर्वाधिक मतदान हे कोल्हापूर जिल्ह्यात झाले. तेथे पदवीधरसाठी ६८.०९ आणि शिक्षकमतदारसंघात ८६.७७ एवढे  मतदान झाले आहे.
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT