BJPs MP Sunny Deols defeat in punjab local election
BJPs MP Sunny Deols defeat in punjab local election 
मुख्य बातम्या मोबाईल

काँग्रेसने 'सनी पाजी'ला पाजले पाणी; मतदारसंघातच मोठा पराभव...

वृत्तसंस्था

चंदीगढ : लोकसभा निवडणुकीत भरभरून मते देणाऱ्या मतदारांनी खासदार सनी देओल यांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत पुर्णपणे नाकारले आहे. त्यांच्या गुरदासपूर मतदारसंघात भाजपला २९ पैकी एकाही जागेवर विजय मिळविता आला नाही. सर्व जागांवर काँग्रेसने ऐतिहासिक विजय मिळवला आहे.

शेतकरी आंदोलनाचा फटका भाजपला बसल्याचे बोलले जात आहे. दीड वर्षापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत सनी देओल यांचा मोठा मताधिक्याने विजय झाला होता. पण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत उलट चित्र दिसून आले. शेतकरी आंदोलनादरम्यान लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचारामध्ये दीप सिध्दूचे नाव पुढे आले आहे. त्याला अटकही करण्यात आली. त्याच्यासोबतचे सनी देओल यांची छायाचित्रे खूप व्हायरल झाली होती. त्यामुळे भाजपनेच ही हिंसा घडवून आणल्याचा दावा विरोधकांकडून करण्यात आला होता.

गुरदासपूरमध्ये झालेल्या निवडणुकीत २९ जागांपैकी एकही जागा भाजपला मिळाली नाही. याठिकाणी अकाली दलाचे २७, भाजपचे २० आणि आम आदमी पक्षाचे १८ उमेदवार मैदानात होते. पण काँग्रेसच्या उमेदवारांनी सर्व वॉर्डांमध्ये विजय मिळवला. 

आज सुरू असलेल्या मतमोजणीमध्ये भाजपला मोठा दणका बसला आहे. शिरोमणी अकाली दलाने आधीच साथ सोडल्याने भाजप पिछाडीवर पडली होती. शेतकरी आंदोलनाचा फटकाही भाजला बसला आहे. त्यामुळे सात महापालिकांच्या निवडणुकीत भाजपला एकही महापालिका मिळालेली नाही. सातही ठिकाणी काँग्रेसने सत्ता मिळविली आहे. मोगा, होशियारपुर, कपूरथला, अबोहर, पठाणकोट, बटाला आणि बठिंडा या महापालिकांवर काँग्रेसने झेंडा फडकावला आहे. 

पंजाबमधील १०९ नगर परिषद व नगर पंचायत आणि सात महापालिकांसाठी १४ फेब्रुवारीला मतदान झाले होते. जवळपास ७१ टक्के मतदान झाले असून आज मतमोजणी सुरू आहे. त्यामध्ये काँग्रेसला सर्वच ठिकाणी आघाडी मिळताना दिसत आहे. या निवडणुकीत ९ हजार २२२ उमेदवार रिंगणात आहेत. त्यामध्ये सर्वाधिक २ हजार ८३१ उमेदवार अपक्ष असून काँग्रेसने २ हजार ३७ उमेदवार उभे केले होते. भाजपचे केवळ १ हजार ३ उमेदवार नशीब अजमावत आहेत. यावेळी भाजपने शिरोमणी अकाली दलाशी आघाडी केलेली नाही. अकाली दलाने १ हजार ५६९ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. मोहाली महापालिकेतील दोन केंद्रांवर आज पुन्हा मतदान होत आहे. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT