Satish Kulkarni
Satish Kulkarni 
मुख्य बातम्या मोबाईल

भाजपच्या मिशन उड्डाणपूल विरोध मोहिमेला घरातूनच धक्का

सरकारनामा ब्युरो

नाशिक : विकासकामांसाठी निधी उपलब्ध व्हावा म्हणून त्रिमूर्ती चौक व मायको सर्कल उड्डाणपुलाचे काम बंद करण्याच्या मागणी (BJP deemands to stop new flyover bridge) करत त्यासाठी व्यूहरचना करणाऱ्या भाजपच्या मोहिमेला धक्का (Bjpcorporator support for flyover work) बसला आहे. पक्षाचेच ज्येष्ठ नगरसेवक शिवाजी गांगुर्डे यांनी पुलाचे काम बंद होऊ देणार नाही, असा पवित्रा घेतल्याने या विषयावरून भाजपमध्ये फूट (Fraction in BJP on this issue) पडली आहे.

गेल्या वर्षाच्या अंदाजपत्रकामध्ये त्रिमूर्ती चौक व मायको सर्कल या भागातील वाहतूक कोंडी लक्षात घेऊन उड्डाणपुलाची निर्मिती करण्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात आली होती. त्यानुसार कामाच्या निविदा प्रसिद्ध केल्या. याच दरम्यान विकासकामांसाठी सत्ताधारी भाजपने दोनशे कोटी रुपयांचे कर्ज काढण्याचे नियोजन केले होते, मात्र प्रशासनाने कर्ज काढण्यास नकार दिल्यानंतर महापौर सतीश कुलकर्णी यांनी अडीचशे कोटी रुपयांच्या उड्डाणपुलाचे काम रद्द करण्याचे पत्र आयुक्त कैलास जाधव यांना दिले.

त्याचवेळी कामाच्या निविदा प्रसिद्ध होऊन कार्यारंभ आदेशदेखील देण्यात आले. गेल्या आठवड्यात झालेल्या महासभेत शिवसेनेचे महानगरप्रमुख व नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी पुलाचे काम थांबवून दाखवा, राजकारण सोडेन असे आव्हानच दिले. बडगुजर यांचे आव्हान भाजपला झोंबल्याने महापौरांच्या मागणीचा आयुक्तांनी अवमान केल्याचे निमित्त करून पुलाचे काम बंद करण्याची तयारी भाजपने सुरु केली आहे. सोमवारी (ता.७) यासंदर्भात आयुक्तांची भेट घेऊन त्यानंतरही काम सुरूच राहिल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला. त्यासाठी तयारी सुरु असतानाच भाजपचेच ज्येष्ठ नगरसेवक शिवाजी गांगुर्डे यांनी काम बंद पडू देणार नाही, असा पवित्रा घेत भाजपच्या मिशन उड्डाणपूल विरोधाला ब्रेक लावत पक्षाच्या भूमिकेत विरोधात बंडाचा पवित्रा घेतला आहे.

त्रिमूर्ती चौकातील पुलाचे काम बंद केले तरी हरकत नाही, परंतु मायको सर्कल येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याने तेथे पूल गरजेचाच आहे. अनेक वर्षांपासून पाठपुरावा केल्यानंतर पुलाला मंजुरी मिळाली. अथक प्रयत्नानंतर काम बंद पडत असेल तर होऊ देणार नाही.
...
मायको सर्कल येथे सकाळी व संध्याकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याने उड्डाणपुलाची आवश्‍यकता आहे. अथक प्रयत्नानंतर पुलाचे काम बंद करण्याची मागणी होत असेल तर त्यास विरोध आहे. शहराची गरज म्हणून पुलाची आवश्‍यकता आहे.
- शिवाजी गांगुर्डे, माजी सभापती, स्थायी समिती.
...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT