Blood Congress
Blood Congress 
मुख्य बातम्या मोबाईल

रक्तदाते हे कोरोना संघर्षातील आघाडीचे सैनिक

सरकारनामा ब्युरो

नाशिक : देशामध्ये व महाराष्ट्रात कोरोना महामारीचा वेगाने प्रसार झालेला आहे. अशा परिस्थितीत करोनाग्रस्त रुग्णांना मदत मिळावी. कोरोनाग्रस्तांच्या कुटुंबियांना सहायता करता यावी.  त्याच प्रमाणे आरोग्य व्यवस्थेवर पडत असलेला ताण लक्षात घेता, मध्य नाशिक ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने आज रक्तदान शिबिर घेण्यात आले. 

या शिबिराचे उदघाटन राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर, यांच्या उपस्थितीत झाले. रक्तदान शिबिराचे आयोजन मध्य नाशिक ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष निलेश (बबलू) खैरे यांनी केले होते. मंत्री ठाकूर म्हणाल्या, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न करण्यात येत आहे. राज्य शासनाने याबाबत विविध उपाययोजना तसेचस निर्णय घेतले आहेत. राज्य सरकार अतिशय एकोप्याने या संकटाचा मुकाबली करीत आहे. यामध्ये कार्यकर्ते व जनतेने आपले योगदान द्यावे. रक्तदान शिबिराचा उपक्रम त्यादृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. हे रक्तदाते कोरोनाविरुद्धच्या लढ्यातील अग्रणी शिपाई आहेत.  

यावेळी माजी आरोग्यमंत्री डॉ शोभाताई बच्छाव, आमदार हिरामण खोसकर, डॉ हेमलता पाटील, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शरद आहेर, जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ तुषार शेवाळे, आदिवासी विभागाचे अध्यक्ष संतोष ठाकूर, अनुसूचित जाती जमातीचे महाराष्ट्र राज्याचे सचिव सुरेश मारू, संदीप गुळवे, नगरसेविका अशा तडवी, माजी नगरसेवक सीराज कोकणी, माजी नगरसेवक लक्ष्मण धोत्रे, सेवा दलाचे ज्येष्ठ पदाधिकारी आर आर पाटील, अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष हनिफ बशीर, युवक काँग्रेसचे अध्यक्ष स्वप्नील पाटील, माजी नगरसेविका सुचेता बच्छाव, ओबीसी विभागाचे नेते विजय राऊत, अनुसूचित जाती जमातीआघाडीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर काळे आदी उपस्थित होते.  
....
हेही वाचा...https://www.sarkarnama.in/top-news-mobile-mahila-nashik/small-mart-scheme-womens-product-all-district-womens-politics-75574

महिलांच्या उत्पादनांसाठी `स्माॅल मार्ट` संकल्पना राबवू

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT