मुंबई : शिवसेना आणि कंगना राणावत यांच्यातील युद्धात अखेर मुंबई महापालिका उतरली. महापालिकेेने कंगनाच्या आॅफीसचे अनधिकृत बांधकाम पाडून टाकले. ते काढून टाकण्यासाठी तिला चोवीस तासांची मुदत देण्यात आली होती. हे बांधकाम अनधिकृत आहे, हे पालिकेने विविध आठ मुद्यांच्या आधारे ठरविले होते.
1)ग्राऊंड फ्लोअरवरील टॉयलेटला ऑफिस केबिन मध्ये रूपांतरीत केले आहे
२) स्टोअर रूमचे किचन रूममध्ये रूपांतर
3) ग्राऊंड फ्लोअरवर पायऱ्यांवर अनधिकृत टॉयलेट
4) तळ मजल्यावर अनधिकृत किचन तयार
5 ) देवघर आणि लिव्हिंग रूम अनधिकृत केबिन आणि लाकडी पार्टिशन
6 ) पहिल्या मजल्यावर अनधिकृत शौचालय
7 ) समोर बाजूस अनधिकृत स्लॅबची निर्मिती
8 ) दुसऱ्या मजल्यावर अनधिकृत जिना निर्मिती
9 ) दुसऱ्या मजल्यावर अनधिकृत बाल्कनी निर्मिती
कंगना राणावतचे वकिल रिजवान सिद्दीकी यांनी आपले म्हणणे पालिकेसमोर मांडले होते. परंतु या उत्तरावर पालिका सहमत झाली नाही. त्यामुळे आज सकाळीच नवीन नोटीस लावण्यात आली होती. त्यानंतर सकाळी 11च्या सुमारास बांधकाम पाडण्यास सुरवात झाली. या कारवाईच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. त्या आधीच पालिकेने तोडफोड थांबवली.
हा सवाल विचारलाय शिवाय मुंबईला पाकिस्तान आणि POK म्हणणं या कंगणाचा विधानांवर देखील भाजपने आक्षेप घेतलाय, आमदार आशिष शेलार यांच्याशी बातचीत केली आहे आमची प्रतिनिधी वैदेही काणेकर ने
शिवसेनेने कंगनाच्या कार्यालयावर केलेल्या कारवाईबाबत भाजपने टीका केली. बीएमसीला या आधी हे अनधिकृत बांधकाम दिसले नाही का, असा सवाल भाजपचे नेते आशिष शेलार यांनी विचारला. कंगना हिनेही सेनेवर टीका करत मुंबई ही पाकव्याप्त काश्मीरमध्ये असल्याचा टोला लगावला. तसेच पालिकेला बाबरची उपमा दिली.
.
....
.....
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.