मुख्य बातम्या मोबाईल

गिरीश महाजन आमच्या मंत्रीमंडळात असते तर त्यांना कधीच घरी पाठविले असते! 

सरकारनामा ब्युरो

बोदवड (जळगाव) : "आपल्या मातेचे नाव दारुच्या बाटलीवर देणाऱ्या मंत्र्यांचे नाव उच्चारणेही योग्य वाटत नाही. आमच्या मंत्रीमंडळात असते तर त्यांना कधीच घरी पाठविले असते', अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे नाव न घेता केली. 

बोदवड येथे राष्ट्रवादीच्या हल्लाबोल सभेमध्ये त्या बोलत होत्या. सुप्रीया सुळे पुढे म्हणाल्या, अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली 22 कोटीची बोदवड परिसर जलसिंचन योजना मंजुर केली. तसेच 600 कोटींचा पहिला हप्ताही टाकला पण खर्च न केल्याने निधी परत गेला. पुढे सरकार बदलले व भाजपा सरकारने उज्वला गॅस योजना सुरु केली. 375 रुपयात गॅस आघाडी सरकारच्या काळात व आज सिलेंडर 726 वर गेले अशी ही फसवी उज्वला गॅस योजना आहे. 

यावेळी माजी प्रदेश अध्यक्ष भास्कर जाधव, माजी विधान सभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजी मंत्री सुनिल तटकरे, माजी मंत्री जयंत पाटील, दिलीप वळसे, राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष सतिष पाटील, जिल्हा नेते रविंद्र पाटील, गफ्फार मलीक, महिला प्रदेश अध्यक्ष चित्राताई वाघ, मनीष जैन, राजेंद्र चौधरी, विजय चौधरी, विनोद तराळ, संतोष चौधरी, संतोष बोदडे, नगरपंचायत गटनेता देवा खेवलकर, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. उध्दव पाटील, धनराज जैस्वाल, तालुका अध्यक्ष शालीग्राम काजळे, सम्राट पाटील, नगरसेवक दिपक झांबड, सुनिल बोरसे, सुशिलाबाई गंगतीरे, वंदना पालवे, सुशिलाबाई पाटील, आफ्रिन बानो सैय्यद असलम बागवान या नगरसेविका सागर जैस्वाल इत्यादी यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT