cyber
cyber 
मुख्य बातम्या मोबाईल

चक्क एसपींच्या नावाने फेसबूक अकाउंट; मित्रांकडे पैशांची मागणी

सरकारनामा ब्युरो

यवतमाळ : सोशल मीडियाचा वापर वाढत असताना हॅकर्स मोठ्या प्रमाणात फसवणूक करण्यासाठी सक्रिय झाले आहेत. चक्क पोलिस अधीक्षकांच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट तयार करून फ्रेंडलिस्टमधील मंडळींकडे पैशांची मागणी करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला.

पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ यांच्याच नावाने फेसबुक अकाउंट तयार करण्यात आले. फ्रेंडलिस्टमधील मयूर वानखेडे याच्या मॅसेंजवर चॅट करीत दिलेल्या क्रमांकावर गुगल पेद्वारे पैशांची मागणी केली. मात्र, पोलिस अधीक्षक आपल्याला पैसे कसे मागू शकतात, असा प्रश्‍न त्याच्या मनात आला. तत्काळ त्याने सायबर शाखेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून माहिती दिली. सोबतच चॅटींगचे स्क्रीन शॉटही पाठविण्यात आले. सायबर सेलच्या अधिकाऱ्यांनी ते फेसबुक अकाउंट डिलीट केले. संबंधित तोतया व्यक्तीने इतरांनाही पैशांची मागणी केल्याची शक्‍यता आहे. विशेष म्हणजे पैसे मागताना दवाखान्यात भरती असल्याचे कारण सांगितले. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. पोलिसांना "तो' मोबाइल क्रमांक मिळाला असून, तोतयापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे.

अनेकांच्या नावे बनावट अकाउंट
तोतयांनी सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, वकील, डॉक्‍टर यांच्या नावाचे बनावट फेसबुक अकाउंट तयार केले आहे. फ्रेंडलिस्टमधील लोकांना मॅसेज पाठवून पैशांची मागणी केली जात आहे. एका सामाजिक कार्यकर्त्यानेही अवधूतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

...
बनावट फेसबुक अकाउंट तयार केल्याप्रकरणी सायबर सेलकडून तांत्रिक तपास केला जात आहे. सीम कार्ड दुसऱ्या व्यक्तीच्या नावाने घेऊन फसवणूक करण्यासाठी वापर केला जाऊ शकतो. या प्रकरणाचा उलगडा करण्याचा प्रयत्न आहे. सामान्य नागरिकांनी अधिक जागरूक असले पाहिजे. पैशांची मागणी केल्यास तत्काळ संबंधित ओळखीच्या व्यक्तीसोबत संपर्क साधल्यास फसवणूक होणार नाही.
- अमोल पुरी, सहाय्यक पोलिस निरीक्षक, सायबर सेल, यवतमाळ.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT