मुख्य बातम्या मोबाईल

लक्झरी बसच उदयनराजेंच्या छबीने सजवली

सरकारनामा ब्युरो

सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्यावरील प्रेमापोटी एका समर्थकाने चक्क लक्झरी बस उदयनराजे यांच्या स्टाईलच्या फोटोंनी सजवली आहे. निष्ठावंत कार्यकर्ता आपल्या नेत्यांसाठी काही करू शकतो. याचा प्रत्यय साताऱ्यात पाहायला मिळत आहे. हे जर खासदार उदयनराजेंच्या कार्यकर्त्याने केले तर त्याला तोड नाही.

उदयनराजे भोसले यांच्यावरील प्रेमापोटी एका समर्थकाने चक्क लक्झरी बस उदयनराजे यांच्या स्टाईल इज स्टाईलच्या फोटोंनी सजवली आहे. नुकतीच उदयनराजे यांच्या जलमंदिर या निवासस्थानी या समर्थकाने ही लक्झरी दाखविण्यासाठी आणली होती. आपल्या हटके स्टाईलच्या चित्रांनी रंगविलेली ही बस पाहून खुद्द उदयनराजेंच्या चेहऱ्यावर हसू उमटले. यावेळी त्यांनी या बस सोबत फोटो काढून समर्थकाच्या या प्रेमाला दाद दिली.  पुसेगाव (ता. खटाव) येथील अक्षय जाधव यांची ही शिवराज ट्रॅव्हलच्या ताफ्यातील ही बस आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT