A case has been registered against MLA Suresh Dhas at Ashti police station
A case has been registered against MLA Suresh Dhas at Ashti police station 
मुख्य बातम्या मोबाईल

झेडपी निवडणूक विरोधात लढवल्याने आमदार सुरेश धसांनी आमचे घर पाडले

सरकारनामा ब्यूरो

बीड : जिल्हा परिषदेची निवडणूक विरोधात लढल्याचा राग मनात भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी आमचे घर पाडल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसच्या माधुरी मनोज चौधरी यांनी बीड जिल्ह्यातील आष्टी पोलिस ठाण्यात दिली होती. त्यावरून आमदार धस यांच्यासह सुमारे ३८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी मध्यरात्री एकच्या सुमारास धस यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. (A case has been registered against MLA Suresh Dhas at Ashti police station)

दरम्यान, आमचे घर पाडणाऱ्या सुरेश धस यांना अटक न झाल्यास मी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या घरासमोर रॉकेल ओतून घेणार असल्याचा इशारा मनोज चौधरी यांनी दिला आहे.

हेही वाचा : शिवसेनेचा राणेंना माथेरानमध्ये; तर भाजप, मनसेला पनवेलमध्ये धक्का
 
नगर-बीड महामार्गावर पांढरी गावच्या हद्दीत आष्टीपासून काही अंतरावर आमचं घर आहे. त्या घराशेजारीच आम्ही हॉटेल उभारणीचे काम सुरू केले होते. त्या जागेचा व्यवहार कायदेशीरपणे झालेला आहे. तसेच त्यासंबंधीची कागदपत्रेही क्लिअर आहेत. मात्र, माझे पती मनोज चौधरी यांनी सुरेश धस यांच्या विरोधात जिल्हा परिषदेची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढवली होती. त्याचा राग मनात धरून धस यांनी आमचं घर जेसीबी मशीनच्या सहाय्याने पाडून टाकले आहे, असे माधुरी चौधरी यांनी फिर्यादीत म्हटलेले आहे. 

त्यांनी पुढे असे म्हटले आहे की, ज्यावेळी धस आणि त्यांच्या ३८ कार्यकर्त्यांनी आमचे घर पाडले, त्यावेळी आम्ही आष्टीला गेलो होतो. ही गोष्ट जेव्हा आम्हाला समजली तेव्ही आम्ही तातडीने घराकडे आलो. मात्र, दरम्यानच्या काळात आमच्यावरही धारदार शास्त्राच्या साहाय्याने हल्ला करत आम्हाला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे आम्ही घाबरून तेथून पळ काढून थेट पोलिस ठाण्यात धाव घेतली.

माधुरी चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भाजपचे विधान परिषद सदस्य सुरेश धस यांच्यावर विविध गुन्ह्याखाली आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार सुरेश धस यांना अटक न केल्यास मी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या बंगल्यासमोर रॉकेल ओतून घेणार असल्याचा इशारा मनोज चौधरी यांनी दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT