Sarkarnama Banner (35).jpg
Sarkarnama Banner (35).jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

CBIउलगडणार सचिन वाझेच्या 'त्या डायरी'ची पाने..वसुली-उधारीची नोंद..'रेटकार्ड' सापडले..   

सरकारनामा ब्युरो

मुंबई : निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे याच्या निकटवर्तीय महिलेच्या घरातूनही एनआयएला एक डायरी सापडली होती. सीबीआयने ती डायरी ताब्यात घेतली आहे. सचिन वाझे आणि विनायक शिंदे यांची डायरी तपासासाठी आपल्याला मिळावी, अशी मागणी केंद्रीय अन्वेषण विभागाने(CBI)न्यायालयात केली होती. 

किती जणांकडून उधारी घेणे बाकी आहे ? याची नोंद डायरीत आहे.  या डायरीच्या आधारे अनेक नवीन आर्थिक गैरव्यवहार उघड होण्याची शक्यता आहे.  वसुली आणि उधारीची नोंद असलेली ही डायरी या प्रकरणात महत्वाचा पुरावा ठरणार आहे.  

या डायरीमध्ये सचिन वाझे खंडणी गोळा करत असलेल्या मुंबईतील बार आणि रेस्टॉरंटसचा तपशील आहे. या डायरीमध्ये त्यांच्या सर्व वसुलीचे रेटकार्ड सापडले आहेत. ही डायरी सीबीआने ताब्यात घेतली आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींची वसूली करण्याचे आदेश दिल्याच्या आरोपांचा सीबीआय प्राथमिक तपास करत आहे.
 
डायरीत या आहेत महत्वाच्या नोंदी

  1. कोणत्या दिवशी कोणाला भेटायचंय, याची तारीख नमूद . 
  2. बुकी,पब्ज, बार आणि अन्य महत्त्वाच्या कारवायांचा उल्लेख .
  3. मुंबईतील सर्व बार, पब आणि हुक्का पार्लरची यादी आहे. 
  4. ज्यांनी पैसे दिले त्याबाबत कोड भाषेत नोंद  
  5. लाखाच्या नोंदीसाठी L, तर हजाराच्या नोंदीसाठी K हे अक्षर वापरले 
  6. बार, पब, हुक्का पार्लर यांची येणारी रक्कम आणि दिलेली रक्कमेची नोंद 
  7. पैशाचं वाटपाबाबत कोड भाषेत नोंद आहे. 
  8. व्यक्तीऐवजी विभागाचे नाव 

अँटिलिया बाँब प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात एनआयएने अटक केलेला पोलिस अधिकारी सचिन वाझे याला पोलिस खात्यातून बडतर्फ करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आल्याचे समजते. वाझेला यापूर्वीच खात्यातून निलंबित करण्यात आले आहे. वाझेकडे सध्या वर उल्लेख केलेली दोन्ही प्रकरणे आणि मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी तत्कालिन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेले आरोप या बाबत चौकशी सुरु आहे. वाझेच्या अनेक गाड्याही पोलिसांनी जप्त केल्या आहेत. आता अटक केलेल्या रियाज कडून एनआयए माहिती घेत आहेत. वाझेची शेवटची नेमणूक विशेष शाखेत होती. त्यामुळे आता त्या खात्याने त्याच्या बडतर्फीची प्रक्रिया सुरु केली आहे. वाझेशी संबंधित सर्व प्रकरणांची कागदपत्रे या शाखेकडे पाठविण्यात आली असून शाखेने वाझे विरोधातील खातेअंतर्गत अहवालही तयार केल्याची माहिती मिळत आहेत.
Edited by: Mangesh Mahale 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT