Anil Deshmukh
Anil Deshmukh 
मुख्य बातम्या मोबाईल

अनिल देशमुखांच्या स्वीय सहाय्यकांना सीबीआयचे समन्स

वृत्तसंस्था

मुंबई : शहराचे माजी पोलिस आयुक्त डाॅ. परमबीरसिंग (Parambri Singh) यांनी तत्कालिन गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर केलेल्या १०० कोटी रुपयांच्या वसुलीप्रकरणाच्या चौकशीसाठी केंद्रीय अन्वेषण विभागाने देशमुख यांच्या दोन स्वीय सहाय्यकांना समन्स बजावले आहे. CBI Summoned Two Personal Assistants of Anil Deshmukh 

या दोन स्वीय सहाय्यकांचे जबाब सीबीआय नोंदवणार आहे. सरकारने बदली केल्यानंतर अस्वस्थ झालेल्या परमबीरसिंग (Parambir Singh) यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पत्र लिहिले होते. महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुखांनी (Anil Deshmukh) सचिन वाझेंना प्रत्येक महिन्याला १००  कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट दिले होते. अनिल देशमुखांनी वाझे यांना हॉटेल, बार आणि इतर अस्थापनांकडून एकूण शंभर कोटी रुपये वसूल करण्यास सांगितले होते. मागील काही महिन्यांत वाझेंना गृहमंत्र्यांनी शासकीय निवासस्थानी अनेक वेळा बोलावले होते. या भेटींमध्ये ते वाझेंना (Sachin Waze) निधी गोळा करण्यासाठी सांगत, असे आरोप परमबीर सिंग यांनी या पत्रात केले होते. 

त्यावर परमबीर सिंग यांनी याबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, ही याचिका न्यायालयाने फेटाळली. मात्र, मुंबईच्या अॅड. जयश्री पाटील यांनी केलेल्या याचिकेवर निर्णय देताना उच्च न्यायालयाने सीबीआयला याप्रकरणाची प्राथमिक चौकशी करण्याचा आणि पंधरा दिवसांत त्याचा अहवाल सादर करण्याचा आदेश दिला आहे. CBI Summoned Two Personal Assistants of Anil Deshmukh 

त्यानुसार सीबीआयने चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. सीबीआयने दोन दिवसांपूर्वी अँटिलिया बाँब प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात संशयित आरोपी असलेल्या सचिन वाझेकडेही चौकशी केली आहे.
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT