Central Team to Visit Thane Today
Central Team to Visit Thane Today 
मुख्य बातम्या मोबाईल

केंद्रीय पथक आज कल्याण-डोंबिवलीला भेट देणार 

सरकारनामा ब्युरो

ठाणे : ठाणे जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे एक केंद्रीय पथक जिल्ह्यात दाखल झाले आहे. हे पथक 15 दिवसांच्या दौऱ्यावर आले आहे.

जिल्ह्याच्या दौऱ्यावर कोलकाता येथून आलेल्या डॉ. दीपक पाल आणि डॉ. केतकी शर्मा यांनी शनिवारी ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयासह ठाणे महापालिकेच्या रुग्णालयालाही भेटी दिल्या. आज हे पथक कल्याण-डोंबिवली येथे भेट देत तेथील परिस्थितीचा आढावा घेणार आहे.

वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे देशातील ज्या-ज्या जिल्ह्यांत कोरोनाच्या रुग्णांची संख्या अधिक आहे, अशा 20 जिल्ह्यांमध्ये दिल्लीहून पथके पाठवण्यात आली आहेत. त्यानुसार ठाणे जिल्ह्यात डॉ. पाल आणि डॉ. शर्मा हे आले आहेत. ते कोरोनाचा अधिक प्रादुर्भाव असलेल्या जिल्ह्याच्या तीन स्तरांवरील रचनेचा आढावा घेणार आहेत. यामध्ये कोव्हिड केअर सेंटर, कोव्हिड हेल्थ सेंटर आणि कोव्हिड जिल्हा रुग्णालय यांचा समावेश आहे. 

डॉक्‍टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांशी संवाद  

जिल्ह्यातील सहा महापालिकांसह नगरपालिका आणि ग्रामीण येथे भेट देणार आहेत. शनिवारी सायंकाळी ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयासह ठाणे पालिकेच्या रुग्णालयाला त्यांनी भेट दिली. या वेळी त्यांनी डॉक्‍टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. त्याचबरोबर त्यांच्या काही समस्याही जाणून घेतल्या आहेत. या वेळी ठाणे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलाश पवार यांच्यासह तेथील डॉक्‍टरही उपस्थित होते.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT