Centre Head Posts in Education Department In Maharashtra Empty
Centre Head Posts in Education Department In Maharashtra Empty 
मुख्य बातम्या मोबाईल

केंद्र प्रमुखांच्या ४७ टक्के जागा रिक्त; शिक्षण विभाग सलाईनवर

उमेश काटे

अमळनेर  : 'कोरोना' चा सर्वच क्षेत्रावर परिणाम झाला असून शिक्षण विभागही त्याला अपवाद ठरलेला नाही.  केंद्रप्रमुखांची संपूर्ण राज्यात ४ हजार ६९५ पदे मंजूर आहेत. यापैकी प्रत्यक्षात २ हजार ४८२ केंद्रप्रमुख कार्यरत असून, २ हजार २०५ पदे अद्याप रिक्त आहेत. सुमारे ४७ टक्के अर्थात निम्म्या केंद्रप्रमुखांच्या जागा रिकाम्या असल्यामुळे अनेक ठिकाणी प्रभारी केंद्रप्रमुख काम पहात आहेत. त्यामुळे राज्याचा शिक्षण विभाग कोरोना काळात 'सलाईन' वर असल्याचे दिसून येत आहे.

काही जिल्ह्यात केंद्रप्रमुखांच्या रिक्त पदांचे प्रमाण जास्त असल्यामुळे एका केंद्रप्रमुखाकडे दोन ते तीन केंद्रांचा अतिरिक्त कार्यभार दिला जात आहे. परिणामी, त्यांच्यावर कामाचा अतिरिक्त ताण येत आहे. 'कोरोना' च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे अनेक शाळांमध्ये ऑनलाइन शिक्षणाचा प्रयोग राबवला जात आहे. या सर्व गोष्टीचे पर्यवेक्षण करण्यासाठी केंद्रप्रमुख महत्त्वाचा घटक आहे.

शासन निर्णयांमध्ये बदल
पूर्वी केंद्रप्रमुखांची पदे सेवेत असलेल्या प्राथमिक शिक्षकांच्या संवर्गाच्या सेवाज्येष्ठतेनुसार शंभर टक्के पदोन्नतीने भरण्यात येत होती. मात्र, त्यांनतर शालेय शिक्षण विभागाच्या २ फेब्रुवारी २०१० च्या शासन निर्णयानुसार यात बदल करण्यात आला. या निर्णयानुसार केंद्रप्रमुखांची चाळीस टक्के पदे सरळ सेवेने, ३० टक्के पदोन्नतीने तर उर्वरित ३० टक्के पदे मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षांद्वारे भरण्याबाबतचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर ग्रामविकास व जलसंधारण विभागाकडील १० जून २०१४ च्या अधिसूचनेद्वारे जिल्हा परिषदेकडून जिल्हा सेवाप्रवेश नियमांमध्ये सुधारणा करण्यात आली.

सरळ सेवेची कार्यवाही नाहीच
दरम्यानच्या काळात केंद्रप्रमुख यांची सरळ सेवेची चाळीस टक्के पदे व मर्यादित विभागीय परीक्षेची २० टक्के पदे भरण्याच्या अनुषंगाने कार्यवाही झाली नाही. त्यामुळे ग्रामविकास व जलसंधारण विभागाकडील २१ फेब्रुवारी २०१५ च्या पत्रान्वये केंद्रप्रमुख यांची पदे भरण्यासाठी नियमित उमेदवार उपलब्ध होईपर्यंत अभावितपणे पूर्णतः तात्पुरत्या स्वरूपात ११ महिन्यांकरिता व पुन्हा एक दिवसाचा खंड देऊन पुढील ११ महिन्यांकरिता त्याच ठिकाणी नेमणूक देण्याबाबत सुचविण्यात आले होते. त्यानुसार अनेक जिल्हा परिषदांनी त्यांच्या स्तरावर ही कार्यवाही केली आहे.

तात्पुरत्या स्वरुपात पदे भरण्याचा प्रस्ताव
बिंदुनामावली व सेवा प्रवेश नियमातील काही अडचणींमुळे तसेच 'कोरोना'च्या संसर्गामुळेही बराच कालावधी जाऊ शकतो. तोपर्यंत ही पदे जिल्हास्तरावर 'अभावित'पणे पदोन्नतीने पूर्णतः तात्पुरत्या स्वरूपात भरण्याबाबत परवानगी मिळण्यास मिळावी, याबाबत प्राथमिक विभागाचे शिक्षण संचालक द. गो. जगताप यांनी शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिवांना तसा प्रस्तावही दिला आहे.

केंद्रप्रमुख रिक्त पदे (टॉप ५ जिल्हे)
जिल्हा टक्के एकूण जागा रिक्त जागा
कोल्हापूर ७६.०२ १७१ १३०
नागपूर ७३.५३ १३६ १००
सोलापूर ६९.८५ १९९ १३९
हिंगोली ६६.१८ ६८ ४५
गोंदिया 62.35 85 53
उत्तर महाराष्ट्र
जिल्हा टक्के एकूण जागा रिक्त जागा
नाशिक ४३.१३ २४४ ११५
जळगाव ४२.१२ १६४ ७४
धुळे ४२.३३ ६० २६
नंदुरबार १८.२८ ९३ १७
नगर ५१.२२ २४६ १२६

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT