maratha
maratha 
मुख्य बातम्या मोबाईल

मराठा आरक्षणासाठी सरकारने लवकर पर्याय ठेवावेत

सरकारनामा ब्युरो

सिडको : कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेता मराठा समाजातील समाज बांधवांनी सध्या तरी शांततेची भूमिका ठेवण्याचे आवाहन सिडको येथे आयोजित मराठा आरक्षण संदर्भात झालेल्या बैठकीत सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी केले.

सिडकोमधील सर्व मराठा समाजाच्या भावना लक्षात घेता आरक्षण हे गरजेचे असून ते मिळालेच पाहिजे, असा सूर उमटला. सर्व समाजाच्या पदाधिकाऱ्यांना कोरोना या महाभयंकर आजाराचे संकट समोर असल्या कारणाने शांत राहण्याचे आवाहन उपस्थित पदाधिकाऱ्यांनी केले. तसेच आरक्षणा संदर्भात आगामी काळात केंद्र व राज्य सरकारकडे जो पर्याय असेल तो लवकरात लवकर केंद्र व राज्य सरकारवर दबाव टाकून खुला करण्यासाठी लढा उभारू असे सूचित करण्यात आले.

या वेळी युवा कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र असून समाजाच्या येणाऱ्या पुढच्या पिढी करता कुठल्या ही स्तराला जाऊन आरक्षण मिळवायचे असे ठरवण्यात आले. मराठा समाजाला आरक्षण मिळावे याबाबत पुढील धोरण आखण्यासाठी सिडकोमधील सर्वपक्षीय मराठा समाजातील ज्येष्ठ नेते तसेच युवा पदाधिकाऱ्यांची बैठकीचे आयोजन डॉ. शालिनीताई बोरसे माध्यमिक विद्यालयात कोरोनाचे सर्व नियम पाळून करण्यात आले. या वेळी नाशिक शहरात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या सर्व बांधवांना श्रद्धांजली वाहण्यात आली. छत्रपती संभाजी महाराज यांनी केलेल्या सूचनेप्रमाणे संयम ठेवून पुढील आरक्षणाची लढाई कोणत्या मार्गाने पुढे न्यावी याबाबत चर्चा करण्यात आली.

या वेळी ज्येष्ठ नेते नानासाहेब महाले, अण्णासाहेब पाटील, आमदार सीमा हिरे, जगनअण्णा पाटील, बाळासाहेब पाटील, आशिष हिरे, बाळासाहेब गीते, संजय भामरे, अविनाश पाटील, अमोल पाटील, आबा पाटील, सुयश पाटील, हर्षल चव्हाण, नाना ठोंबरे, भूषण पाटील, संजय देशमुख, महेश देवरे, शिवाजी पाटील योगेश गांगुर्डे, विजय पाटील उपस्थित होते.
...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT