Chagan Bhujbal orders inquiry into inconvenience case of female patients
Chagan Bhujbal orders inquiry into inconvenience case of female patients 
मुख्य बातम्या मोबाईल

महिला रुग्णांची गैरसोय झाली अन् भुजबळांनी घेतली तातडीने दखल

संपत देवगिरे

नाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शिरसगाव प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये महिलांच्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबीरप्रसंगी बेडअभावी महिला रुग्णांची गैरसोय झाली होती. या प्रकरणाची दखल घेत नाशिकचे पालकमंत्री व राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्यामार्फत चौकशी केली जाणार आहे. चौकशीचा अहवाल आल्यानंतर याप्रकरणात दोषी असलेल्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिल्याचे बनसोड यांनी सांगितले. त्याचप्रमाणे शस्त्रक्रिया झालेल्या स्त्री रुग्णांना दुस-या प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच उपकेंद्रात हलविण्याच्या सुचनाही गटविकास अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांना देण्यात आले आहेत.

कोरोनाचे संकट आल्यामुळे मधल्या काळात जिल्ह्यातील कुंटुंबनियोजन शस्त्रक्रिया थांबल्या होत्या. लॉकडॉऊन शिथील झाल्यानंतर डिसेंबरपासून जिल्हयात कुटुंब नियोजन शस्त्रक्रियांना सुरुवात झाली. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया हा नियमित स्वरुपाचा कार्यक्रम असून एप्रिल ते मार्चपर्यंत नियमित स्वरुपात याची अंमलबजावणी करण्यात येते.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्र्यंबकेश्वर तालुकयातील शिरसगाव प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबीर आयोजित करण्यात आले होते. यामध्ये ४१ महिलांनी नोंदणी केली होती. प्राथमिक आरोग्य केद्रातील वैद्यकीय अधिका-यांनी बेडच्या उपलब्धतेबाबत रुग्णांना पूर्वकल्पना दिली होती. मात्र बेडअभावी काही  रुग्णांची गैरसोय झाल्याचे निर्दशनास आल्याने प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करू असे आदेश भुजबळ यांनी दिले आहेत.

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT