मुख्य बातम्या मोबाईल

शिवसेनेची माघार, मात्र संभाजी ब्रिगेड विरोधावर ठाम

सरकारनामा ब्युरो

पंढरपूर : कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यास आता संभाजी ब्रिगेडनेही विरोध दर्शवला आहे. संभाजी ब्रिगेड पश्‍चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष किरण घाडगे यांनी विरोध केला. 

शुक्रवारी (ता.8) कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार आहे. महसूलमंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या विठ्ठलाच्या शासकीय महापुजेस मंगळवारी येथील शिवसेनेच्या कार्यकर्त्याने विरोध केला होता. त्याचे तीव्र पडसाद उमटले होते. त्यानंतर तातडीने मंदिर समितीचे सदस्य व जिल्हा शिवसेना प्रमुख संभाजी शिंदे यांनी चंद्रकांत पाटील यांना महापूजा करण्यात विरोध नसल्याचे स्पष्ट करत श्री. पाटील यांचे स्वागत करु असे स्पष्ट केले. त्यामुळे शिवसेनेने आपले आंदोलन म्यान केले असले तरी संभाजी ब्रिगेडने मात्र चंद्रकांत पाटलांना विरोध केला आहे. 

 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT