ajit pawar-sharad pawar
ajit pawar-sharad pawar 
मुख्य बातम्या मोबाईल

आता अजित पवारांवर भाजपचा हा नेता करणार पीएच. डी

सरकारनामा ब्यूरो

पुणे : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी शरद पवार यांच्या पीएच.डी करण्याची इच्छा महिनाभरापूर्वी जाहीर केली होती. आता त्यानंतर त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही पीएच.डी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. दोन पवारांवरील पीएच.डी चा अभ्यास त्यांना झेपणार का, अशी चर्चा त्यामुळे सुरू झाली आहे.

एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी शरद पवारांनंतर अजित पवार यांच्यावर पीएच.डी करण्याची तयारी असल्याचे चंद्रकांतदादांनी सांगितले. शरद पवार यांच्यावरील इच्छा व्यक्त केल्यानंतर पवार यांनी त्यावर नेहमीच्या तिरकस शैलीत प्रतिक्रिया दिली होती. माझ्यावर पीएच.डी करायला पाटील यांना बरेच जन्म घ्यावे लागतील, असे शरद पवार म्हणाले होते. त्यावर पाटील यांनी आपला हट्ट मागे न घेता दुप्पट केला आहे. 

या मुलाखतीत बोलताना शिवसेनेशी युती सरकार स्थापन करण्याच्या प्रयत्नांविषयी भाष्य केले आहे. ते म्हणाले,  “शिवसेनेला काय हरकत होती बैठकीची. बोलायचं ना देवेंद्रजींना चार वाजता बसायचय तर तुम्ही आत्ता कशाला बोललात. चार वाजता बैठकीला बसायला काहीच अडचण नव्हती. ती एक बैठक झाली असती तर पुढचा सगळा वाद आणि संघर्ष टळला असता. ती बैठकच झाली नाही. सगळं स्पष्ट झालं असतं त्या बैठकीमध्ये. दरवेळेला काय निरोप पाठवाला त्यांनी अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्री विषय पक्का असेल तर इथं फिरकायचं. मध्यंतरी मी जाणार असं ठरलं. तर मला तुमच्याकडे अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्री करायला हरकत नाही असं लेखी असेल तर यावं असं सांगण्यात आलं. नंतर स्टॅम्प पेपरवर अडीच वर्षाचं मुख्यमंत्रीपद मिळेल असं लिहून द्यावं लागेल, अशी मागणी झाली. असे व्यवहार असतात का? ती एक बैठक झाली असती तर अनेक बैठका झाल्या असत्या,” असं पाटील यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT