Chandrakant Patil will not be removed from the post of state president : Devendra Fadnavis
Chandrakant Patil will not be removed from the post of state president : Devendra Fadnavis  
मुख्य बातम्या मोबाईल

चंद्रकांत पाटलांना प्रदेशाध्यक्षपदावरून हटविणार का..? फडणवीसांनी दिले हे उत्तर....

सरकारनामा ब्यूरो

पुणे : प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना बदलाची कोणतीही चर्चा भाजपत नाही. चंद्रकांतदादा हे उत्तम काम करत आहेत. पक्ष त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. पक्षश्रेष्ठीही चंद्रकांतदादांसोबत आहेत, आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी आहोत. त्यामुळे कंड्या पेटवू नका, पतंगबाजी करु नका. प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांतदादा कायम राहतील, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात बोलताना स्पष्ट केले. (Chandrakant Patil will not be removed from the post of state president : Devendra Fadnavis)

पुण्याच्या दौऱ्यावर असलेले माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज (ता. ७ ऑगस्ट) माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी चंद्रकांत पाटील यांना बदलण्याबाबतच्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. 

फडणवीस म्हणाले की, भारतीय जनता पक्षामध्ये कोणतेही संघटनात्मक बदल नाहीत. केंद्रात नवीन मंत्रीमंडळ झालेलं आहे, त्यांच्या भेटीगाठी आणि महाराष्ट्राचे प्रश्न मार्गी लागावेत, यासाठी राज्यातील भाजप नेत्यांचा दिल्ला दौरा आहे. त्यात वेगळे असे काही नाही. चंद्रकांत पाटील हे उत्तम काम करीत आहेत. पक्ष आणि पक्षाचे वरिष्ठ नेतेही दादांच्या पाठीशी आहेत, त्यामुळे त्यांना बदलण्याचा प्रश्नच नाही. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्या भेटीबाबत फडणवीस म्हणाले की, याबाबत चंद्रकांत पाटील यांनीच काल स्पष्टपणे सांगितले आहे. तसेच मेट्रोच्या पाहणीनंतर मी त्यासंदर्भात बोलेन. आताच त्यावर मी बोलणार नाही, असेही फडणवीस यांनी बोलताना स्पष्ट केले. 

काँग्रेस पक्ष निवडणुकीत २० टक्के आरक्षण देणार आहे. ओबीसी आरक्षण मिळेल की नाही, याबाबत संभ्रम आहे, असे नाना पटोले म्हणाले आहेत. यावर फडणवीस यांनी सांगितले की नाना पटोले काय बोलले हे मी ऐकलं नाही. त्यावर मी कुठलही भूमिका मांडत नाही. भारतीय जनता पक्षाची भूमिका कायम आहे. ओबीसी राजकीय आरक्षण कायम होत नाही, तोवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात येऊ नये, अशी आमची भूमिका आहे. 

समाजातील काही घटकांपर्यंत अजूनही आरक्षण पोचले नाही. ते त्यांच्यापर्यंत पोचविण्यासाठी आरक्षण दीर्घकाळापर्यंत सुरू ठेवावे लागेल. जे आरक्षणापासून वंचित आहेत, त्यांच्यापर्यंत ते पोचले पाहिजे. वंचित घटकामध्येही काहीजण वंचित आहेत, त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. आरक्षणाचे फायदे त्यांच्यापर्यंत पोचावावे लागतील, असे मत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT