Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal 
मुख्य बातम्या मोबाईल

छगन भुजबळ म्हणाले, मीच ज्येष्ठ नागरिक, आणखी काय हवे! 

सरकारनामा ब्युरो

नाशिक : अखिल भारतीय साहित्य संमेलन नाशिकला होत आहे. यासंदर्भात स्थानिक प्रतिनिधींची आढावा बैठक आज स्वागताध्यक्ष, पाकमंत्री छगन भजुबळ यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी एव्हढ्या सुचना आल्या की, त्याचे वर्णन सुचनांचा पाऊस पडला असे संयोजकांनी केले.

यावेळी एका प्रतिनिधीने साहित्य संमेलनात ज्येष्ठाना, त्यांच्या प्रश्‍नांना पुरेसे स्थान मिळावे, असा आग्रह धरला. त्यावर भुजबळ म्हणाले, अहो, "मी ज्येष्ठच आहे. मला थेट स्वागताध्यक्ष केले आहे. अजुन काय पाहिजे?.' या उत्तराने वातावरण खुषखुषीत होत उपस्थितांत चंगलीच खसखस पिकली. 

नाशिक येथे गोखले शिक्षण संस्थेच्या प्रिन्सिपल टी. ए. कुलकर्णी नगरी येथे मार्च महिन्यात अखिल भारतीय साहित्य संमेलन होत आहे. त्याचे कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज नगरी असे नामकरण करण्यात आले आहे. संमेलनाचे कार्यक्रम आणि त्याचे वेळापत्रक प्रामुख्याने साहित्य परिषदेकडून केले जाते. त्यामुळे खरे तर स्थानिक नागरिकांनी केलेल्या सुचनांच्या कार्यवाहीला मर्यादा असतात. मात्र स्वागताध्यक्ष भुजबळ यांनी संयोजकांसह स्थानिक प्रतिनिधी, कार्यकर्ते यांची बैठक आज घेतली. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. अनेक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठक सुरु झाल्यावर बराच वेळ या सुचनांची सरबत्ती सुरुच होती. ती थांबतच नव्हती. त्यामुळे त्यात हस्तक्षेप करीत स्वागताध्यक्ष म्हणाले, आपल्या सुचनांतील उत्साह चांगला आहे. अक्षरशः सुचनांचा पाऊसच पडला आहे. त्यामुळे त्या सगळ्यांची दखल घ्यायची तर आपल्याला नाशिककरांचे स्वतंत्र संमेलन घ्यावे लागेल. एव्हढ्या सुचनांविषयी काय बोलणार?. कारण संमेलनाचे वेळापत्रक मराठी साहित्य परिषद करते. तुम्ही फार तर नेमक्‍या सुचना व त्याची कार्यवाही यावर काम करावे. 

यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी चेतन पनेर यांनी, समाजात ज्येष्ठांचे प्रमाण मोठे आहे. समाजातील जवळपास वीस टक्के घटक, शैली, व्यवहार ज्येष्ठांशी संबंधीत असतात. त्यामुळे या ज्येष्ठांच्या समाज जीवनाला साहित्य संमेलनात तेव्हढेच प्रमुख स्थान मिळाले पाहिजे. त्यासाठी सर्वांनी आग्रह धरावा. ते उत्साहाने आणखी सुचना करीत होते तेव्हा त्यांना मधेच थांबवत छगन भुजबळ म्हणाले, "अहो मी ज्येष्ठच आहे. महापौर, प्राचार्य एम. एस. गोसावी हे देखील ज्येष्ठ आहेत. त्यांनी मला अर्थात ज्येष्ठांवर थेट स्वागताध्यक्षाची जबाबदारी दिली आहे. आणखी काय पाहिजे. तेव्हा सगळ्यांनी सहकार्य करा अन्‌ हे संमेलन यशस्वी करा.' 

यावेळी महापौर सतीश कुलकर्णी, गोखले शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य एम. एस. गोसावी, आमदार हिरामन खोसकर, साहित्यिक चंद्रकांत महामिने, संयोजक जयप्रकाश जातेगावकर यांनी मार्गदर्शन केले. बैठकीत दत्ता पाटील, ज्ञानेश सोनार, श्री. कोतकर, डॉ. वेदश्री थिगळे, संजय चौधरी, डॉय प्रतिभा जाधव, रमेश देशमुख, स्वानंद बेदरकर, संजय गिते, गिरीष पिंपळे, वसंत खैरनार, श्रीकांत बेणी आदींनी विविध सुचना केल्या. 
... 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT