CB Vaccine
CB Vaccine 
मुख्य बातम्या मोबाईल

पालकमंत्री छगन भुजबळांनी महापालिका रुग्णालयात लस घेतली

सरकारनामा ब्युरो

नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून रुग्णसंख्या दुपटीने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी महानगरपालिका रुग्णालयांवर नागरिकांचा विश्वास वाढावा यासाठी नाशिक मनपाच्या पंचवटीतील इंदिरा गांधी रुग्णालयात कोरोना प्रतिबंधक लस घेतली. 

बुधवारी महापालिकेच्या डॅा झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सीजनच्या टाकीला घलती लागली. त्याने रुग्णांना प्राणवायू मिळाला नाही. दिड तास प्रामवायूचा पुरवठा बंद होता त्यामुळे चोविस रुग्णांचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर महापालिका यंत्रणा व रुग्णालयांवर विश्वास वाढावा यासाठी पालकमंत्र्यांनी हा निर्णय घेतला. त्यांनी लस घेतल्यानंतर रुग्णालयातील कर्मचारी, परिचारीका यांच्याशी चर्चा केली. कोरोनाच्या स्थितीत काय उपाययोजना, उपचार केले जातात याची माहिती घेतली. 

गेल्या दोन महिन्यांपूर्वी पालकमंत्री छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने मुंबई येथील निवासस्थानी उपचार घेतले. त्यानंतर आज त्यांनी नाशिक शहरातील मनपाच्या पंचवटीतील इंदिरा गांधी रुग्णालयात जाऊन कोरोना प्रतिबंधक लस टोचून घेतली. यावेळी त्यांच्या समवेत माजी खासदार समीर भुजबळ यांनी देखील लस घेतली. तसेच या ठिकाणी लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांशी संवाद साधून सर्व नागरिकांनी नाशिक महापालिकेच्या रुग्णालयात लसीकरण करून घ्यावे, असे आवाहनही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
....

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT