CM Uddhav Thackeray Takes oath as MLA in Mumbai
CM Uddhav Thackeray Takes oath as MLA in Mumbai 
मुख्य बातम्या मोबाईल

अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 'आमदार' बनले

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज आमदारकीची शपथ घेतली. विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी त्यांना विधान परिषद सदस्यत्वाची शपथ दिली. उद्धव यांच्या रुपाने ठाकरे घराण्यात दुसरी आमदारकी आली आहे. 

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सहा महिन्यांच्या आत आमदार होणे आवश्‍यक असते. ही मुदत २७ मे रोजी संपत होती. कायदा आणि नियमांची पूर्तता करण्यासाठी त्यांनी आमदार होणे आवश्‍यक होते. राज्यपालांनी नामनियुक्त सदस्य करण्याची शिफारस डावलल्यानंतर निवडणूक आयोगाने विशेष परवानगी दिल्याने महाराष्ट्रात नऊ जागांसाठी १२ मे रोजी निवडणूक होणार होती. राज्यातील करोना संकट आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची उमेदवारी याचा विचार करून कॉंग्रेस पक्षाने एक उमेदवार मागे घेण्याची भूमिका घेतली. त्यामुळे सर्व सदस्य बिनविरोध निवडले गेले. 

आज दुपारी एक वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमवेत परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (शिवसेना)शशिकांत शिंदे, अमोल मिटकरी (राष्ट्रवादी कॉंग्रेस) राजेश राठोड (कॉंग्रेस) यांना तसेच भाजपच्या चार सदस्यांना शपथ दिली जात आहे. या चौघांच्या निवडून येण्यामुळे  परिषदेत भाजपचे बहुमत झाले आहे. रणजितसिंह मोहिते-पाटील, रमेश कराड, गोपीचंद पडळकर आणि प्रवीण दटके हे चार भाजप सदस्य आमदार होत आहेत.

दरम्यान,  राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा शिवसेना उपनेते गुलाबराव पाटील यांनी आज जळगावात ठाकरे कुटुंबीयांविषयीच्या आठवणींना उजाळा देताना भावनिक प्रतिक्रिया दिली. 'आज आमचे नेते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आमदारकीची शपथ घेणार असून आम्हा शिवसैनिकांसाठी हा सुवर्ण दिवस आहे. पण दुःख एकाच गोष्टीचे आहे की आज शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे नाहीयेत. आजचा सुवर्ण दिवस पाहण्यासाठी 'बाळासाहेब' हवे होते', अशा शब्दांत गुलाबराव पाटलांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT