chief minister uddhav thackery adresses peoples of state
chief minister uddhav thackery adresses peoples of state 
मुख्य बातम्या मोबाईल

सर्व दुकाने, सरकारी कार्यालये सुरू होणार : उध्दव ठाकरे 

सरकारनामा ब्युरो

सातारा : कोरोनाचे लॉकडाउन शिथिल करून येत्या तीन जूनपासून सर्व काही सुरू करणार आहोत. सर्व दुकाने पाच जूनपासून सुरू होतील. त्यामध्ये लहान व मोठ्या शहरांतील रस्त्याच्या दुतर्फा असलेली दुकाने पार्किंगच्या समविषम नियमानुसार एक दिवसाआड सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दुकाने सुरू झाली म्हणून गर्दी अजिबात करू नका, असे आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला केले आहे.

सोशल मीडियावरून मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेशी संवाद साधला. ते म्हणाले की, कोरोनासोबत जगायला शिका असे सल्ले आतापर्यंत अनेकांनी दिले आहेत. आता बाहेर पडताना मास्क वापरणे अनिवार्य आहे. सतत हात धुणे गरजेचे आहे. लॉकडाउन शिथिल करताना इतर देश काय करतात, हेही पाहणे गरजेचे आहे. काही देशांनी लॉकडाउन केलाच नव्हता. काहींनी तो उठविला. शाळा सुरू केल्या आणि पुन्हा बंद केल्या. आपण मात्र, तसे काहीही करणार नाही. आपण जे सुरू करू ते पुढे सुरूच ठेवणार आहोत. जी गोष्ट सुरू केली ती पुन्हा बंद करणार नाही.

आता केवळ किनारपट्टीला धोका आहे. इतरत्र तीन तारखेपासून हातपाय हालवायला आपण सुरवात करू या. यामध्ये पहाटे पाच ते सायंकाळी सात यावेळेत जे लोक पहाटे चालायला, व्यायाम करायला जातात त्यांना परवानगी आहे. पण त्यातून गर्दी करायला परवानगी दिलेली नाही. आम्ही कोणत्याही सभा, समारंभाला परवानगी दिलेली नाही. त्यामुळे व्यायामासाठी बाहेर फिरताना सुध्दा अंतर ठेऊन फिरा. एकमेकांपासून अंतर ठेवा तेच अंतर आपल्याला कोरोनापासून दूर ठेवणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 


येत्या तीन जूनपासून आपण सर्व काही सुरू करतोय. त्यामध्ये पाच तारखेपासून लहान- मोठ्या शहरांतील दुकाने आपण सुरू करत आहेत. त्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा दुकानांपैकी एका बाजूची दुकाने एक दिवस व दुसऱ्या बाजूची दुकाने दुसऱ्या दिवशी सुरू करण्याचा निर्णय घेत आहोत. पण गर्दी होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. आपण जे सुरू करू ते सतत सुरू ठेऊ. महाराष्ट्राचा वेगळा आदर्श इतरांनी घेतला पाहिजे. पुढचा सोमवारी (ता. आठ) आपण सर्व शासकिय कार्यालये सुरू करत आहोत. ज्या पध्दतीने मंत्रालयातील कामकाज हळूहळू करत शंभर टक्के बंद करावे लागले. आता आपण सर्व शासकिय कार्यालये दहा टक्के मनुष्यबळावर सुरू करत आहोत, असे त्यांनी नमूद केले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT