2Saroj_Final
2Saroj_Final 
मुख्य बातम्या मोबाईल

कोरिओग्राफर सरोज खान यांचे निधन 

सरकारनामा ब्युरो

मुंबई : प्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान (वय 72) यांचे मुंबईत बांद्रा येथील रूग्णालयात मध्यरात्री निधन झाले. श्वसनाचा त्रास होत असल्याने गेल्या काही दिवसापासून त्यांच्यावर गुरूनानक रूग्णालयात उपचार सुरू होते. उपचाराला त्या उत्तम प्रतिसाद देत होत्या. त्यांच्या तब्बेतीत सुधारणा होत होती. सरोज खान यांचा मृत्यू ह्दयविकाराच्या झटक्याने झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. त्यांची कोरोना तपासणी करण्यात आली होती. त्याचा अहवाल निगेटिव्ह आला होता. 


त्यांचा जन्म 22 नोव्हेंबर 1948 रोजी मुंबईत झाला होता. सरोज खान यांचे नाव निर्मला नागपाल होते.  भारत-पाकिस्तान विभाजनानंतर त्या भारतात आल्या होत्या. त्यांनी वयाच्या तिसऱ्या वर्षापासून बाल कलाकार म्हणून चित्रपट क्षेत्रात काम केले होते. त्यांनी आपले नृत्यगुरू सोहनलाल यांच्याशी लग्न केले होते.

1986 पासून त्यांनी चित्रपटांमध्ये नृत्यदिग्दर्शक म्हणून कामास सुरवात केली. 2019 पर्यंत त्या चित्रपट क्षेत्रात सक्रिय होत्या. चालबाज, नगीना, तेजाब, खलनायक, मिस्टर इंडिया, चांदनी, हम दिल दे चुके सनम, देवदास सारख्या प्रसिद्ध चित्रपटात त्यांनी कोरियाग्राफी केली होती.कलंक हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता. कलंक या चित्रपटातील  'तबाह हो गए... ' यासाठी कोरियाग्राफ केले होते. यात माधुरी दिक्षित नृत्य करताना दिसत आहे.

आतापर्यंत सुमारे 200 पेक्षा जास्त चित्रपटात त्यांनी कोरिओग्राफर म्हणून काम केले होते. दिल धक धक करने लगा, डोला रे डोला, काटे नही कटते, हवा-हवाई, निंबुडा-निंबुडा, एक-दोन तीन, ना जाने कहा से आई है, हमको आजकल है इंतजार, चोली के पीछे यासारख्या अनेक सुपरहिट आणि ऐतिहासिक गाण्यांचे नृत्यदिग्दर्शन सरोज खान यांनी केले होते. 

त्यांनी शिकवलेल्या नृत्यामुळे अनेक कलाकारांना यश मिळाले. त्यांना अनेक पुरस्कारांना सन्मानित करण्यात आले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज त्यांचा पार्थिवावर मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. सर्वसामान्य, रसिक, सेलिब्रेटी यांनी सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT