Antijan test.jpg
Antijan test.jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

नगर तिसऱ्या लाटेच्या तोंडावर ! दिवसभरात आढळले हजारावर कोरोना पाॅझिटिव्ह

सरकारनामा ब्युरो

नगर : जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालल्याने आता सर्वांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. दुसऱ्या लाटेत झालेली परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहे. मात्र काही बेफिकिरांकडून कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा पालन केले जात नसल्याचे दिसून येत आहे. काल दिवसभरात तब्बल एक हजार २६ बाधित आढळून आलेले आहे. (The city is at the mouth of the third wave! Thousands of patients were found during the day)

जिल्ह्यात कालअखेर दोन लाख ९३ हजार ७५८ बाधित रुग्ण आढळून आलेले आहेत. त्यातील दोन लाख ८३ हजार १४६ जणांनी कोरोनावर मात केलेली आहे. सध्या रुग्णालयात ४४९६ जणांवर उपचार सुरु आहेत. आजअखेरपर्यंत पोर्टलवरील ६११६ जणांची मृत्यूची नोंद झालेली आहे. आज (रविवारी) दिवसभरात ७५२ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलेले आहे. जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.३९ टक्के इतके झाले आहे. जिल्ह्यात रूग्ण संख्येत एक हजार २६ ने वाढ झालेली आहे. यामध्ये जिल्हा रुग्णालयाच्या तपासणी अहवालात २४६, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणीत ३९८ व अँटीजेन चाचणीत ३८२ रुग्ण बाधीत आढळले.

बाधितांचा आकडा काल सर्वाधिक पारनेर तालुक्यात आढळून आलेला आहे. पारनेर तालुक्यात सर्वाधिक २१० रुग्ण आढळून आलेले आहे. त्याखालोखाल जामखेड तालुक्यात जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचे रुग्ण आढळून आलेले आहेत. जामखेडमध्ये आज दिवसभरात १८० रुग्ण आढळून आलेले आहेत. तिसऱ्या क्रमांकाचे रुग्ण शेवगाव तालुक्यात आढळले आहेत. शेवगावमध्ये ९७ रुग्ण आढळून आलेले आहेत.

तालुकानिहाय रुग्णांची आकडेवारी

पारनेर ः २१०, जामखेड ः १८०, शेवगाव ः ९७, कर्जत ः ७४, संगमनेर ः ७०, नगर ग्रामीण ः ६६, नेवासे ः ५९, पाथर्डी ः ५९, अकोले ः ५२, राहुरी ः ४३, राहाता ः २६, नगर शहर ः २३, कोपरगाव ः १९, श्रीरामपूर ः १९, इतर जिल्हा ः १२.

खरबरदारी न घेतल्यास परिस्थिती गंभीर

जिल्हा प्रशासनाडून कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहे. परंतु नागरिकांकडून गांभिर्याने त्याची दखल घेतली जात नसल्याने कोरोनाचा आलेख वाढत चालला आहे. नागरिकांनी वेळीच आता खबरदारी न घेतल्यास परिस्थिती गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT