3download_20_281_29_85 (1).jpg
3download_20_281_29_85 (1).jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

महापालिकेत शिवसेना-भाजपात जुंपली ; ठेकेदारांवरुन खडाजंगी

सरकारनामा ब्युरो

मुंबई : मुंबईतील (bmc)रस्ते कामांबाबतच्या निविदा प्रक्रियेवरून सत्ताधारी शिवसेना  (shiv sena)आणि भाजप (bjp) यांच्यात चांगलीच जुंपली आहे.  रस्ते दुरुस्तीच्या कामांवर शिवसेना, भाजप पुन्हा आमने सामने आले आहेत.  भाजपकडून या कामांबाबत राजकारण करून मुंबईकरांना वेठीस धरण्याचा प्रयत्न सुरु आहे. या कंत्राटात भाजपचे ठेकेदार आले नाहीत म्हणून त्यांचा आटापिटा सुरु आहे, असा आरोप शिवसेनेने केला आहे.

स्थायी समितीच्या बैठकीत, रस्ते कामांच्या निविदांवरून भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी हरकतीचा मुद्दा मांडून रस्ते कामांबाबतच्या निविदेत ३०% कमी दरात रस्ते काम करण्यात येणार असल्याने रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत शंका उपस्थित करून फेर निविदा काढण्याची आणि मागील २५ वर्षातील रस्ते कामांची श्वेत पत्रिका काढण्याची जोरदार मागणी केली.

रस्ते दुरुस्तीच्या निविदांमध्ये कंत्राटदार ४० ते ५० टक्के कमी दाराने काम करण्यास तयार आहेत. त्यामुळे रस्त्यांच्या दर्जावर प्रश्‍न निर्माण होत असल्याने ही निविदा प्रक्रिया रद्द करावी, अशी मागणी भाजपने आज महापालिकेच्या स्थायी समितीत केली. त्यावर भाजपच्या ठेकेदारांना कंत्राट मिळणार नसल्याची भीती असल्याने ही मागणी करण्यात येत असल्याचा प्रतिहल्ला शिवसेनेने चढवला.

रस्त्यांच्या कामात भाजप खोडा घालत आहे. भाजपच्या मर्जीतल्या कंत्राटदाराला काम मिळणार नाही, अशी भीती असल्याने हा आरोप केला जात आहे. रस्ते दुरुस्तीची कामे अडवून भाजप विकासाच्या कामात खोडा घालत आहे, असा आरोप स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी केला. रस्ते दुरुस्तीच्या कंत्राटात कठोर नियमांचा अंतर्भाव करावा. आतापर्यंत रस्ते दुरुस्तीवर दरवर्षी हजारो कोटी रुपयांचा खर्च होतो; मात्र खड्ड्यातून सुटका होत नाही. त्यामुळे गेल्या २५ वर्षांतील रस्ते दुरुस्तीच्या कामाची श्‍वेतपत्रिका काढा, अशी मागणी भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली.  

अगोदरच रस्ते कामांना उशिर झालेला असताना भाजपकडून या कामांबाबत राजकारण करून मुंबईकरांना वेठीस धरण्याचा प्रयत्न सुरु आहे. या कंत्राटात भाजपचे ठेकेदार आले नाहीत म्हणून त्यांचा आटापिटा सुरु आहे. कमी खर्चाच्या निविदा आल्या तर पालिकेचा फायदाच होणार आहे. मात्र फेर निविदा काढल्याने नुकसान होणार आहे. भाजपची ही भूमिका रस्ते कामांत खोडा घालण्याची आहे, असे आरोप यशवंत जाधव यांनी भाजपवर केले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT