Aher- Bhujbal
Aher- Bhujbal 
मुख्य बातम्या मोबाईल

छगन भुजबळ, राहूल आहेरांचे परस्परांवर शाब्दीक बाण!

सरकारनामा ब्युरो

नाशिक :  भाजपचे आमदार डॅा. राहूल आहेर (MLA questionend Administration on Covid Treatment and Facilities) यांनी काल आढावा बैठकीत विविध प्रश्नांची सरबत्ती केली. त्यावर पालकमंत्री छगन भुजबळ (Guardian Minister Chhagan Bhujbal intrupt) यांनी त्यांना सूचना करा, असे सुचवले. त्यानंतर पालकमंत्री भुजबळ आणि आमदार आहेर (BJP MLA Dr Rahul Aher) यांनी एकमेकांवर फेकलेल्या शाब्दीक बाणांमुळे काही वेळ बैठकीचा नुरच बदलला.

जिल्ह्यातील कोरोनाच्या आढाव्यासाठी लोकप्रतिनिधींची बैठक काल जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात झाली. यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांसह सर्व यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हा शल्य चिकीत्सकांनी दिलेल्या माहितीत सर्व काही आलबेल असल्याचे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न होत होता. त्यात हस्तक्षेप करून आमदार आहेर यांनी कोरोना संदर्भात विविध अडचणी व शासकीय यंत्रमेतील कामकाजातील तफावतीची माहिती देण्यास सुरवात केली. 

यावेळी आमदार डॅा आहेर म्हणाले, जिल्ह्यातील नागरिक उपचार, तपासण्या आणि सीटीस्कॅन करण्यासाठी गर्दी करीत असताना जिल्हा रुग्णालयाची यंत्रणा कुठे असते?. काय करते?. याची काहीच माहिती नसते. सर्व सावळागोंधळ आहे. येथील सीटीस्कॅन यंत्र बंद कसे?. त्याबाबत सिव्हील सर्जन यांनी काय कार्यवाही केली?. सूचखाजगी संस्था दिवसभारत तीनशे सिटीस्कॅन करतात. जिल्हा शासकीय रुग्णालयात किती सिटीस्कॅन होतात?. अशी प्रश्नांची सरबत्तीच त्यांनी केली. त्यावर पालकमंत्री छगन भुजबळ यांनी त्यांना अडवत, तुम्ही सूचना करा. कोणती कामे व्हावीत या सूचना करा, असे सांगण्याचा प्रयत्न केला. 

जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसह सगळ्यांचेच लक्ष मोबाईल स्क्रीन अन् अन्य चर्चा सोडून या शाब्दीक बाणांकडे गेले. पालकमंत्र्यांच्या सूचनेनंतर डॅा. आहेर म्हणाले, अहो मी सूचनाच करीत आहे. जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींच्या या भानवा व मागण्या आहेत. सीटीस्कॅन मशीन का बंद आहे, याचे जिल्हा शल्य चिकीत्सकांनी सांगावे. जिल्ह्याभरातून लोक जिल्हा शासकीय रुग्णालयात येतात, त्यांच्यासाठी ही यंत्रणा काय करते हे सांगावे. या शाब्दीक बाणांनी सभागृहातील चर्चा व बैठकीचा नूरच बदलला. काहींनी या चर्चेचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावर व्हायरल केल्याने तो चर्चेचा विषय ठरला. 

या बैठकीनंतर आमदार आहेर म्हणाले, जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. नागिरकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. उपचाराच्या सुविधा व कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधी दोघेही प्रयत्नशील आहेत. तीच चर्चा बैठकीत झाली. त्यात कुठेही वाद किंवा मतभेदांचा विषय नाही. सगळे मिळून या स्थितीवर मात करण्यासाठी सक्रीय आहेत. 
....    
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT