close down toll plaza demands sadabhu khot
close down toll plaza demands sadabhu khot 
मुख्य बातम्या मोबाईल

टोल नाक्यावर नोटांना हात लागत असल्याने 'कोरोना'चा धोका!

सरकारनामा ब्युरो

सातारा : कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेऊन महामार्गावरील टोलनाके बंद करावेत, अशी अपेक्षा व्यक्त करून टोलनाक्‍यांवर होणारी गर्दी पाहता येथे संसर्गाची अधिक भीती आहे. याबाबत मुख्यमंत्री याबाबत तातडीने निर्णय घेतील, असे मत माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केले.

एका सुनावणीच्या निमित्ताने कोल्हापूरकडे जाताना माजी मंत्री सदाभाऊ खोत वाढेफाटा येथे संघटनेच्या कार्यकर्त्यांशी भेटण्यासाठी अल्पवेळ थांबले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

सदाभाऊ खोत म्हणाले, कोरोना विषाणूबाबत संसर्ग टाळण्यासाठी सरकार अनेक उपाय योजना करत आहे. सरकार एका बाजूला उपाय योजना करत असून जनतेला दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. पण एक महत्वाची सूचना करावी वाटते. या कालावधीत टोलनाके बंद करणे अत्यंत गरजेचे आहे. टोलनाक्‍यावर विविध राज्यातून प्रवाशी येत असतात. टोल देण्यासाठी पैशाची देवाणघेवाण होते. पैसा देणारा आणि घेणारा एकच असला तरी सगळ्यांचे नोटांना हात लागत असल्याने या माध्यमातून विषाणू पसरण्याचा धोका आहे. याची गांभीर्याने दखल घेऊन कोरोना विषाणूचा संसर्ग बंद होईपर्यंत टोलनाके बंद करावेत, असे ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT