CM Mamata Banerjee wishes in marathi for Ganesh Festival
CM Mamata Banerjee wishes in marathi for Ganesh Festival 
मुख्य बातम्या मोबाईल

ममता बॅनर्जींनी मराठीतून दिला सुखद धक्का!

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : गणेशोत्सव म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात मोठा उत्सव. चैतन्यमयी अन् उत्साहाच्या वातावरणात हा उत्सव दरवर्षी साजरा केला जातो. यंदा कोरोनाचे संकट असले तरी शुक्रवारी गणेशाचे मंगलमय वातावरणात आगमन झालं. या आनंदाच्या उत्सवानिमित्त अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. (CM Mamata Banerjee wishes in marathi for Ganesh Festival)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून गणेशोत्सवाच्या मराठीतून शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान मोदी यांच्याकडून महाराष्ट्रातील सण, उत्सव किंवा अनेक महत्वाच्या प्रसंगी मराठीतून संदेश देतात. 'आपणा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. हा शुभ प्रसंग प्रत्येकाच्या जीवनात सुख, शांती, सौभाग्य आणि आरोग्य घेऊन येवो. गणपती बाप्पा मोरया!', असं ट्विट मोदी यांनी केलं आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ट्विटरवरून गणेशभक्तांना मराठीतून शुभेच्छा देत सुखद धक्का दिला आहे. 'आजपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! या मंगलप्रसंगी आपल्या सर्वांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि कल्याणासाठी मी श्रीगणेशाचरणी प्रार्थना करते. गणपती बाप्पा मोरया!, असं ट्विट त्यांनी केलं आहे.

तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, काँग्रेसचे नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह अनेक नेत्यांनी ट्विटरवरून गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, देशात केरळ पाठोपाठ महाराष्ट्रात कोरोनाचे संकट सर्वाधिक आहे. तिसऱ्या लाटेचा धोका वर्तवण्यात आला आहे. त्यामुळं गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन राज्य सरकारनं केलं आहे. 

महाराष्ट्राप्रमाणेच गोवा, कर्नाटकमध्ये गणेशोत्सवाच्या पाश्वर्भूमीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. देशात महाराष्ट्रामध्ये सार्वजनिक गणेसोत्सव सर्वात मोठा असतो. त्यामुळे अधिक दक्षता घेतली जात असल्याचं सरकारचं म्हणणं आहे. तसेच गणेश मंडळांनीही सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत हा उत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT