CM Uddhav Thackeray Called Mancha Sarpanch
CM Uddhav Thackeray Called Mancha Sarpanch 
मुख्य बातम्या मोबाईल

मंचरच्या सरपंचांना चक्क मुख्यमंत्र्यांचा फोन (आॅडिओ)

डी.के वळसे-पाटील

मंचर  : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मंचर (ता. आंबेगाव) ग्रामपंचायतीचे सरपंच दत्ता गांजाळे यांना रविवारी (ता. 19) फोन आला. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मंचर शहरात प्रभावीपणे अंमलबजावणी केल्याबद्दल ठाकरे यांनी गांजाळे यांचे कौतुक केले. मुख्यमंत्र्यांच्या मोबाईलमुळे गांजाळे हे भारावून गेले. 

सरपंच व मंचर ग्रामपंचायत राबवित असलेल्या कोरोना उपाययोजनाबाबत विविध उपक्रमांची माहिती शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानावर घातली. ठाकरे यांनी गांजाळे यांना गावाची काळजी घेण्याबाबत सांगितले.  कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी नियोजन करून नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे गांजाळे यांनी आवाहन केले.

गांजाळे यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेली कामे

सोडियम हायपोक्लोराईट द्रावणाची संपूर्ण शहरात फवारणी करून परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. तसेच लॉकडाऊन काळात नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा नियमितपणे पुरवठा व्हावा म्हणून अत्यावश्यक सेवा घरपोच देण्याचा निर्णय घेतला. आरोग्य सुरक्षिततेसाठी निर्जंतुकीकरण कक्षाची उभारणी केली. प्रशासकीय अधिकाऱ्यांचा ताण कमी व्हावा म्हणून लॉकडाऊन काळात प्रत्येक रविवारी जनता कर्फ्यूचे पाळला. गावची भैरवनाथ यात्रा रद्द करून परप्रांतीय लोकांसाठी अन्नधान्याचे व किराणा मालाचे वितरण करण्यात आले. शहरातील गरीब व गरजू लोकांच्या दोन वेळच्या जेवणाची सोय व्हावी म्हणून जेवण व जीवनावश्यक वस्तूंचे स्थानिक प्रशासन व

सरपंचांचा महिनाभरापासून ग्रामपंचायत कार्यालयातच मुक्काम

गांजाळे हे ग्रामपंचायत कार्यालयातच महिनाभरापासून मुक्कामी असून ते स्वतः फार्मासिस्ट असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवाहन केल्याप्रमाणे त्यांनी मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात फार्मासिस्ट म्हणून सेवा करण्याची संधी मिळावी म्हणून मागणीही केली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT