CM uddhav thackray files nomination for legislative council
CM uddhav thackray files nomination for legislative council 
मुख्य बातम्या मोबाईल

बाळासाहेबांच्या घरातील दुसरे ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात : उद्धव यांचीही संपत्ती जनतेला कळणार

सरकारनामा ब्यूरो

पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधान परिषद निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला. त्यांच्यासोबत शिवसेनेकडून नीलम गोऱ्हे यांनीही अर्ज सादर केला. या निमित्ताने पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांची संपत्ती कळणार आहे. 

मी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नाही, अशी घोषणा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती. मात्र पहिल्यांदा त्यांचे नातू आदित्य हे विधानसभेच्या रिंगणात उतरले आणि आता त्यांचे पुत्र उद्धव ठाकरेही निवडणुकीसाठी अर्ज भरते झाले. मुलगा विधानसभेत आणि वडील विधान परिषदेत असे आता पाहावयास मिळणार आहे. या निमित्ताने उद्धव ठाकरे यांची संपत्तीही कळणार आहे. हा अर्ज भरते वेळी रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, श्रेयस ठाकरे हे ठाकरे कुटुंबीय उपस्थित होते. याशिवाय सुभाष देसाई, अनिल देसाईहे शिवसेनेचे नेतेही हजर होते.   

मुख्यमंत्र्यांसाठी महत्त्वाची असलेली ही निवडणूक आता बिनविरोध होणार आहे. काँग्रेसनं जाहीर केलेल्या सहाव्या उमेदवारामुळे महाविकास आघाडीत तणाव निर्माण झाला होता. विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत काँग्रेसने दोन उमेदवार दिल्याने महाविकास आघाडीत संभ्रम निर्माण झाला होता. काँग्रेसच्या निर्णयावर मुख्यमंत्र्यांनी नाराजी देखील व्यक्त केली होती. त्यानंतर काँग्रेसनं एक उमेदवारी मागे घेतल्यानं ही निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.


या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षानं जालना जिल्ह्यातल्या राजेश राठोड तर अंबेजोगाईचे माजी नगराध्यक्ष राजकिशोर ऊर्फ पापा मोदी अशा दोघांना उमेदवारी दिली होती. त्यानंतर जर काँग्रेस आडमुठेपणा सोडणार नसेल तर मी विधान परिषद निवडणुक लढवणार नाही, असा निरोप उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब थोरातांना दिला होता. पहिल्यापासून विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध लढवण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस उत्सुक होते.

आज उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर येत्या 14 मे पर्यंत उमेदवारी मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. तर 21 मे रोजी मतदानाची तारीख आहे. विधानपरिषदेचे 8 सदस्य 24 एप्रिलला निवृत्त झालेत. त्यापैकी एक जागा 24 एप्रिलच्या आधीपासून रिक्त आहे. यात राष्ट्रवादी आणि भाजपचे प्रत्येकी 3 सदस्य 24 एप्रिलला निवृत्त झालेत. तर शिवसेना आणि काँग्रेसचा प्रत्येकी 1 सदस्य निवृत्त होईल. संख्याबळानुसार महाविकास आघाडीचे 5 तर भाजपचे 4 उमेदवार निवडून येतील.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT