Nagar Mahapalika1.jpg
Nagar Mahapalika1.jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

नगरच्या आयुक्तांचा घूमजाव, शहरात पुन्हा कडक लाॅकडाऊन

सरकारनामा ब्युरो

नगर : नगर शहरात महापालिका आयुक्‍तांनी लागू केलेला कडक लॉकडाउन काही प्रमाणात शिथिल करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. मात्र महापालिका आयुक्त शंकर गोरे (Shankar Gore) यांनी एका दिवसात हा निर्णय बदलला आहे. त्यांनी नगर शहरात पुन्हा एक जूनपर्यंत कडक लॉकडाउन जाहीर केला आहे. आयुक्‍तांचा हा निर्णय नागरिकांच्या टीकेच्या केंद्रस्थानी होता. (Commissioner's move, tight lockdown in the city again)

महापालिका आयुक्‍त शंकर गोरे यांनी तीन मे रोजी नगर शहरात कडक लॉकडाउन जाहीर केले होते. या कडक लॉकडाउनला 10 मे रोजी पुन्हा मुदतवाढ देण्यात आली. ही मुदत 15 मे रोजी संपत होती.

शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी होत असल्याने आयुक्‍त गोरे यांनी शहरातील कडक लॉकडाउन काही प्रमाणात शिथिल करत जीवनावश्‍यक वस्तूंची दुकाने खुली करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे हातावर पोट असलेले नागरिक व व्यापारी वर्गाला काहीसा दिला मिळाला होता. 

मात्र शनिवारी सकाळी शहरातील रस्त्यांवर खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. दुकानांसमोर रांगा लागल्या होत्या. सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. अनेक जण विनाकारण रस्त्यावरून फिरत असल्याचे चित्र दिसत होते. अशीच परिस्थिती राहीली, तर पुन्हा शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढण्याची शक्‍यता लक्षात घेत आयुक्‍त गोरे यांनी आज पुन्हा कडक लॉकडाउनचे आदेश काढले आहेत. एका दिवसात त्यांनी घूमजाव केल्याने ते नागरिकांच्या टीकेच्या केंद्रस्थानी होते. 

हेही वाचा..

हे राहणार सुरू 
* वैद्यकीय सेवा, औषध दुकाने 
* अत्यावश्‍यक सेवेसाठी पेट्रोल पंप 
* घरपोच गॅस वितरण सेवा 
* सर्व बॅंका 
* दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्री (सकाळी 7 ते 11) 
* पशुखाद्य विक्री (सकाळी 7 ते 11) 
* बी-बियाणे, खते व किटकनाशके दुकाने (सकाळी 7 ते 11) 
* पीठाची गिरणी 

हे बंद राहील 
* किराणा दुकाने, तदानुषंगिक मालाची खरेदी-विक्री 
* भाजीपाला व फळे बाजार मालाची खरेदी-विक्री 
* सर्व खासगी अस्थापना 
* अंडी, मटण, चिकन व मासे विक्री 
* शेती निगडीत मशिनरी, पंप आदी 
 

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT