jayshree madan patil searching new political opportunities
jayshree madan patil searching new political opportunities 
मुख्य बातम्या मोबाईल

जयश्री पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चेने सांगलीची काँग्रेस झाली सावध

संपत मोरे

पुणे: सांगलीतील दिवंगत नेते, माजी मंत्री मदन पाटील यांच्या पत्ना जयश्री पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवेशाबाबत चर्चा सुरू असताना त्यांना काँग्रेसमध्ये थांबवण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

जयश्री पाटील  यांना काँग्रेस पक्षात योग्य ती ताकद मिळत नसल्याने त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. याबाबत त्यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही. मात्र 'सध्या मीटिंग सुरू आहे. अजून काही नक्की नाही,'असे उत्तर त्यांच्या निकटवर्तीयांनी दिले.

राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली तेव्हा वसंतदादा पाटील यांचे पुतणे विष्णुअण्णा पाटील यांनी शरद पवार यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला. दादांचे सुपूत्र प्रकाशबापू पाटील हे काँग्रेससोबत राहिले. यावेळी झालेल्या लोकसभा निवडणुकीत प्रकाशबापू पाटील यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसकडून मदन पाटील यांची लढत झाली. या लढतीत प्रकाशबापू विजयी झाले. त्यानंतर दादा घराणे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विभागले गेले. त्यांच्यात सत्ता संघर्ष सुरू झाला. काही काळाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात डावलले जात असल्याचे सांगत मदन पाटील यांनी पुन्हा काँग्रेसची वाट धरली. ते काँग्रेसमध्ये आले. सांगली विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी डाववली तेव्हा त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली. काँग्रेसचे सहयोगी सदस्य झाले. त्यांना मंत्रिमंडळात काम करण्याची संधी मिळाली. 2014 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र त्यांचा पराभव झाला. नंतर काही दिवसांनी त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या गटाचे नेतृत्व त्यांच्या पत्नी जयश्री पाटील करत आहेत .

गेल्या काही दिवसापासून जयश्री पाटील या काँग्रेस पक्षात नाराज आहेत. काही दिवसांपूर्वी त्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्या येत होत्या. आज सकाळपासून जयश्री पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे. याबाबत पाटील यांच्या निकटवर्तीयांशी संपर्क साधला असता, 'चर्चा सुरू आहे' अस सांगण्यात आले. तसेच जयश्री पाटील यांना काँग्रेसमध्येच थांबवण्यासाठी काही नेते प्रयत्न करत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

धीरज कुमार राज्याचे नवे कृषी आयुक्त 

पुणे : कृषी आयुक्त सुहास दिवसे यांची पीएमआरडीए मध्ये बदली झाल्यानंतर त्यांच्याजागी धीरज कुमार यांची नियुक्त करण्यात आली आहे. धीरज कुमार हे 2005 च्या बॅचचे आयएएस अधिकारी असून ते 2018 पासून उत्तर प्रदेशमध्ये प्रतिनियुक्तीवर होते. धीरजकुमार हे अभियांत्रिकी क्षेत्रातील उच्च शिक्षित आहेत.

Edited by swarup jankar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT