congress mla and mp donates one month sallery for prime minister fund
congress mla and mp donates one month sallery for prime minister fund  
मुख्य बातम्या मोबाईल

काँग्रेसचे आमदार-खासदार एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री निधीसाठी देणार 

सरकारनामा ब्यूरो

संगमनेर (नगर): कोरोनाच्या मुकाबल्यासाठी काँग्रेस पक्षाचे विधानसभा व विधानपरिषदेतील आमदार, तसेच लोकसभा व राज्यसभेच्या खासदारांचे एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री मदत निधीसाठी देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.

ते म्हणाले, कोरोनामुळे 21 दिवसांच्या लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकार कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चांगले काम करीत आहे. या कामात अनेक सामाजिक संस्था, उद्योगपती, तसेच व्यक्तीगत पातळीवरूनही सरकारला आर्थिक मदत करण्यासाठी हजारो हात पुढे आले आहेत. राष्ट्रहित व देशवासियांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत, काँग्रेस पक्षाने सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली मदतनिधीसाठी खासदार व आमदारांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यभरातील जनतेने या काळात नियमांचे काटेकोर पालन करुन, घरातच राहून सरकारला मदत करावी. या कठीण काळात पोलिस यंत्रणा, आरोग्य कर्मचारी तसेच विविध शासकीय विभागातील कर्मचारी आरोग्यदूत म्हणून जनतेची सेवा करीत आहेत.  

कोरोनाच्या निर्मूलनासाठी मदत देवू इच्छिणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र सरकारने सुरु केलेल्या मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड - 19 या स्वतंत्र बँक खात्यात आपली मदत जमा करण्याचे आवाहन थोरात यांनी केले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT