rajiv satav ff.jpg
rajiv satav ff.jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

काँग्रेस खासदार राजीव सातव यांचे निधन 

सरकारनामा ब्यूरो

पुणे : काँग्रेसचे सरचिटणीस (General Secreataty of Congress) नेते आणि राज्यसभा खासदार राजीव सातव (Rajiv Satav) यांचे निधन झाले आहे. त्यांच्यावर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचार सुरु होते. या संदर्भात काँग्रेसचे प्रवक्ते रणदीपसिंग सुरजेवाला यांनी ट्वीट करुन माहिती दिली आहे. 
(Congress MP Rajiv Satav dies in Corona)

राजीव सातव हे कोरोनामुक्त झाले होते मात्र, त्यांना इन्फेक्शन झाले असल्याने त्यांची प्रकृती नाजूक असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल जालना येथे बोलताना दिली होती. त्यांना लवकरच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार असल्याची माहिती देण्यात आली होती. मात्र, त्यांच्या शरीरात सायटोमॅगीलो हा नवा व्हायरस सापडला होता.  

19 एप्रिलला सातव यांना कोरोनाची लक्षणे दिसून आली होती. 22 तारखेला त्यांची स्वॅब टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. 23 एप्रिलला ते पुण्यातील जहांगीर रुग्णालयात दाखल झाले. 25 तारखेला त्यांची प्रकृती खालवल्यामुळे त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. तर काही तक्रारींमुळे 28 तारखेला त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मुंबईतील लीलावती रुग्णालयामधील डॉक्टरांच्या टीमने सातव यांच्यावरील उपचारासाठी मदत केली होती.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रुग्णालयातील डॉक्टरांना फोन करत सातव यांच्या प्रकृतीसंबंधी विचारपूस केली होती. राहुल गांधी आणि डॉक्टरांमध्ये बराच वेळ चर्चा सुरु होती. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनीही सातव यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. तर राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी जहांगीर रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली होती. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT