NCP Shivsena Congress Maha Shiv Aghadi
NCP Shivsena Congress Maha Shiv Aghadi 
मुख्य बातम्या मोबाईल

महाशिवआघाडीची  बैठक आज; वेळ आणि ठिकाणाबाबत मात्र गुलदस्तात

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राज्यात सत्तास्थापनेसाठी हालचाली सुरु असून आज शिवसेना - काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाशिवआघाडीची बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, ही बैठक केव्हा आणि कुठे होईल, हे मात्र अद्याप सांगण्यात आलेले नाही. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तिन्ही पक्षांचे नेते आज एकत्र भेटणार आहेत. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे व दोन्ही काँग्रेसचे नेते चर्चा करतील, असे सांगण्यात आले आहे. दरम्यान, ''सरकार स्थापणे ची सकारात्मक चर्चा सुरू आहे. काल काँग्रेस राष्ट्रवादीची बैठक झाली. कॉमन अजेंडा काय असावा याबाबत आमच्यात चर्चा झाली. राष्ट्रवादी काँग्रेस ची एकत्रित चर्चा होऊन अजेंडा तयार झाल्यावर शिवसेनेशी चर्चा केली जाईल,'' असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सांगितले आहे. त्यामुळे महाशिवआघाडीची बैठक आजच होईल किंवा कसे याबाबत संभ्रम आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT