Sarkarnama Banner - 2021-08-12T125644.053.jpg
Sarkarnama Banner - 2021-08-12T125644.053.jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

कॉग्रेस टि्वटरच्या विरोधात आक्रमक ; फेसबूकवरुन दिलं उत्तर

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : कॉग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि कॉग्रेसच्या काही नेत्यांचे टि्टवर अकाऊंट टि्वटरने बंद केले आहेत. कॉग्रेसच्या नेत्यांचे टि्वट हॅडल @INCIndia बंद करण्यात आले आहे, ही माहिती कॉग्रेसने आपल्या फेसबूक पेजवरुन दिली आहे. त्यांचा स्क्रीनशॉट कॉग्रेसने आपल्या फेसबूक पेजवरुन शेअर केला आहे.  कॉग्रेसने टि्वटरला उत्तर दिले आहे. 

''जेव्हा आमचे नेते हे कारागृहात बंद होते तेव्हाही आम्ही घाबरलो नाही. आता आमच्या नेत्यांचे टि्वट अकाऊंट बंद केल्याने आम्ही घाबरणार नाही. आम्ही कॉग्रेस आहे, जनतेचा आवाज आहे. आम्ही याविरोधात लढणार..लढत राहणार. बलात्कार पीडित मुलीला न्याय देण्यासाठी आवाज उठविणे जर गुन्हा असेल तर असे गुन्हे आम्ही शंभर वेळा करु. जय हिंद,..सत्यमेव जयते!'' असे उत्तर कॉग्रेसने टि्वटरला दिले आहे. 

मंदिरं उघडण्यासाठी भाजपकडून ठाकरे सरकारला अल्टिमेटम
काँग्रेस (Congress) नेते खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याविरोधात ट्विटरने गेल्या आठवड्यात कारवाई केली होती. ट्विटरने राहुल गांधी यांचे खाते तात्पुरते लॉक केले. राहुल गांधी यांनी ट्विटरवर दिल्लीमधील बलात्कार पीडितेच्या कुटुंबासोबतचा फोटो टाकला होता त्यामुळे ही कारवाई करण्यात आली होती. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने ट्विटर इंडियाला नोटीस पाठवली होती. त्यानंतर आता काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला (Randeep Surjewala) यांच्यासह पाच वरिष्ठ नेत्यांच्या अकाऊंटवर अशीच कारवाई करण्यात आली आहे.

काँग्रेस सरचिटणीस आणि माजी केंद्रीय मंत्री अजय माकन, माणिकम टागोर, माजी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह व महिला काँग्रेस अध्यक्षा सुष्मिता देव यांचे ट्विटर अकाऊंट निलंबीत करण्यात आले आहेत. त्याच बकोबर राज्याचे महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांचेही ट्वीटर अकाऊंट निलंबीत करण्यात आले आहेत. राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ ''मैं_भी_Rahul असे ट्विट केल्यामुळे कारवाई करण्यात आली आहे.  

राहुल गांधी यांनी गेल्या आठवड्यात एका नऊ वर्षांच्या मुलीच्या कुटुंबाची छायाचित्रे ट्विट केली होती. बलात्कार करुन हत्या करण्यात आली होती.  राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने (एनसीपीसीआर) त्यांच्या ट्विटची दखल घेतली आणि अल्पवयीन पीडितेच्या गोपनीयतेचे उल्लंघन केल्याबद्दल काँग्रेस नेत्याच्या खात्यावर कारवाई करण्याचे निर्देश ट्विटरला दिले होते. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT