Corona patients increased in five districts of the state
Corona patients increased in five districts of the state 
मुख्य बातम्या मोबाईल

वाढत्या कोरोनामुळे या पाच जिल्ह्यांनी राज्याची चिंता वाढवली

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : कोरोना रुग्णांची संख्या राज्यात सध्या कमी-जादा होताना दिसून येत आहे. एकीकडे, राज्यातील १६ जिल्हे कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करीत आहेत, तर दुसरीकडे राज्यातील पाच जिल्ह्यांत अजूनही वाढत असलेल्या कोरोनाच्या संसर्गामुळे डोकेदुखी वाढत आहे. (Corona patients increased in five districts of the state)

राज्यात एकाच आठवड्यात कोरोनाचे ४५ हजार २० नवे रुग्ण सापडले आहेत. यात सर्वाधिक रुग्ण पुण्यात ९,०९४, नगरमध्ये ६,३८८, साताऱ्यात ६,०४६, सोलापूरमध्ये ५,६१८ आणि सांगलीमध्ये ४,८१० रुग्ण सापडल्याची नोंद आहे. राज्यातील इतर ३१ जिल्ह्यांमध्ये फक्त १३ हजार ०६४ नवीन रुग्ण सापडले आहेत, तर पाच जिल्ह्यांतच साडेएकतीस हजार रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे या जिल्ह्यातील संसर्गाला अटकाव कसा करायचा, असा प्रश्न आता प्रशासनापुढे आहे. 

महाराष्ट्र आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या साप्ताहिक अहवालानुसार सध्या नंदुरबार जिल्हा कोरोनामुक्त झाला आहे. याशिवाय १६ जिल्ह्यांत १०० पेक्षा कमी रुग्ण उपचाराधीन आहेत. सध्या राज्यात कोरोना पॉझिटिव्हिटीचा रेट २.४९ टक्के इतका आहे, तर सात जिल्ह्यांमध्ये कोरोना पॉझिटिव्हिटीचा दर त्याहून जास्त आहे. सध्या पुण्यात ५. ६२ टक्के, सांगली ४. ६६ टक्के, नगर ४. ६३ टक्के, सातारा ४. ४४ टक्के, उस्मानाबाद ३. ५८ टक्के, सिंधुदुर्ग ३. २४ टक्के, सोलापूर २.९० टक्के, रत्नागिरी २.६५ टक्के आणि नाशिकमध्ये २. ५९ टक्के पॉझिटिव्हिटी दर आहे.

राज्यातील १६ जिल्ह्यांत कोरोनाचे १०० पेक्षा कमी रुग्ण आहेत. ते जिल्हे आणि रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे ः वर्धा - ४, गोंदिया- ४, यवतमाळ - ६, भंडारा- ६, वाशिम- १०, धुळे- १७, परभणी- २१, अकोला- २१, गडचिरोली - २५, नांदेड- ३४, बुलडाणा- ३४, जळगाव- ४१, हिंगोली- ६१, जालना- ८५, अमरावती- ९३, नागपूर- ९७  या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण शंभरपेक्षा कमी आढळून आलेले आहेत. पाच जिल्ह्यांनी मात्र राज्याच्या आरोग्य विभागाची चिंता वाढवली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT