Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal 
मुख्य बातम्या मोबाईल

आता डेल्टा प्लसच्या रूपाने कोरोनाचे आव्हान

सरकारनामा ब्युरो

नाशिक : दुसरी लाट संपली असली, (second wave of covid19 is over) तरी नवीन डेल्टा प्लस विषाणूच्या रूपाने कोरोनाचे आव्हान कायम आहे. (But in form of Delta plus it exists) संभाव्य तिसरी लाट व नवीन डेल्टा प्लस या विषाणूचा संसर्ग पसरण्याची क्षमता जास्त असल्याने नागरिकांनी स्वत: काळजी घेऊन कोरोना त्रिसूत्रीचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केले.

मुंबई येथून दूरदृश्यप्रणालीद्वारे गुरुवारी (ता. २४) श्री. भुजबळ यांनी कोरोनापश्चात आजारांबाबत माहिती घेतली. जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महापालिका आयुक्त कैलास जाधव, पोलिस आयुक्त दीपक पांडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. कपिल आहेर, अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त दुष्यंत भामरे, मालेगाव महापालिकेचे आयुक्त भालचंद्र गोसावी उपस्थित होते.

पालकमंत्री म्हणाले, की केंद्र सरकारच्या सल्लागार समितीमार्फत डेल्टा प्लस या विषाणूच्या अनुषंगाने काळजी घेण्याच्या सूचना मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आल्या. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट व डेल्टा प्लस या विषाणूंचे गांभीर्य लक्षात घेऊन नागरिकांनी विनाकारण गर्दी टाळावी, मास्कचा नियमित वापर, सुरक्षित अंतर व वैयक्तिक स्वच्छता या त्रिसूत्रीचा नियमितपणे अंगीकार करावा. जेणेकरून डेल्टा प्लस या नव्याने येणाऱ्या विषाणूचा सामना करू शकतो.

ब्रेक द चेन’ अंतर्गत जिल्ह्यात लागू असलेल्या निर्बंधामध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. कडक संचारबंदीच्या अंमलबजवणीसाठी पोलिस यंत्रणेमार्फत कठोर कारवाई करावी. जिल्ह्यात लिक्विड मेडिकल ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प लवकर सुरू करावेत. रुग्णालयात बेडची उपलब्धता, ऑपरेशन थिएटर, आवश्यक औषधसाठा याकडे लक्ष देऊन नियोजन करावे. जिल्हाधिकारी मांढरे यांनी म्युकरमायकोसिस आजाराच्या उपाययोजनांची माहिती दिली.
.... 
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT