Sarpanch
Sarpanch 
मुख्य बातम्या मोबाईल

गावगाडा हाकणा-या सरपंच, उपसरपंचांनाही हवी कोरोना लस

सरकारनामा ब्युरो

एकलहरे : ग्रामीण भागात सर्वाधीक नागरिकांशी संपर्क व ग्रामपंचायतीचा गावगाडा हाकण्याचे काम सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत पदाधिका-यांना करावे लागते. सध्याचा कोरोनाचा प्रसार विचारात घेता त्यांना प्राधान्याने कोरोना लस देण्यात यावी. याबाबत राज्य सरकारने तातडीने निर्णय घ्यावा असी मागणी अखिल भारतीय सरपंच परिषदेने केली आहे. 

यासंदर्भात परिषदेच्या शिष्टमंडळाने आज जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांची भेट घेऊन निवेदन दिले. कोरोना कालावधीत सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामपातळीवर कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. गावं कोरोनापासून सुरक्षित ठेवली. त्यामुळे त्यांना कोरोना लस देण्याची गरज आहे. मात्र सध्या शासनाच्या प्राधान्यक्रमात त्यांचा समावेष करण्यात आलेला नाही. दुस-या टप्प्यातील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य शासनाने विविध उपाययोजना सुचविल्या आहेत. त्याच्या कार्यवाहीत ग्रामस्तरावरील लोकप्रतिनिधी हा महत्त्वाचा घटक आहे. त्याचा विचार करून त्यांना तातडीने कोरोनो लस देण्याची गरज आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील कोरोना विरोधातील लढा अधिक प्रभावी होईल.  

अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या नाशिक जिल्हा शाखेच्यावतीने जिल्हाधिकारी मांढरे यांना  निवेदन देण्यात आले.  यावेळी जिल्हाधिका-यांनी ग्रामीण भागात करावयाच्या उपाययोजनांविषयी त्यांना विविध सूचना केल्या. सरपंच व पदाधिकारी यांचा जनतेशी प्रत्यक्ष संबंध येत असल्याने त्यांना कोरोना लस देणे आवश्यक असल्याचे यावेळी चर्चेत त्यांनी सांगितले. प्रत्येक ग्रामपंचायतीचा चौदाव्या वित्त आयोगाच्या निधींवरील व्याजाची रक्कम जिल्हा परिषदेने कोरोना उपाययोजनेकरिता जमा केली असून त्याचा वापर तात्काळ ग्रामीण भागातील ग्रामस्थांना मोफत लसीकरणासाठी वापरण्यात यावा. 

या मागणीचा सकारात्मक विचार करू असे आश्वासन जिल्हाधिकारी मांढरे यांनी दिले. याप्रसंगी सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष तानाजी गायकर, महाराष्ट्र शाखेचे कार्याध्यक्ष अनिल ढिकले, जिल्हा संघटक सदानंद नवले, नाशिकचे तालुकाध्यक्ष सागर जाधव उपस्थित होते.
...
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT