Ambedkar Jayanti
Ambedkar Jayanti 
मुख्य बातम्या मोबाईल

कोरोना निर्देशांचे उल्लंघन, पोलिसांवर दगडफेक

सरकारनामा ब्युरो

नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने बुधवारी रात्री आठनंतर संचारबंदी लागू केली. याचदरम्यान नाशिक रोड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे कार्यक्रमाला प्रचंड गर्दी झाली. कार्यक्रमानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना कार्यकर्ते पांगविताना काही समाजकंटकांनी पोलिसांच्या दिशेने दगड फेकले.

या घटनेने काही काळ वातावरण तणावपूर्ण झाले होते. पोलिसांनी त्वरित हस्तक्षेप केल्याने थोड्याच वेळात शांतता झाली. परिसरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिवसभरात उत्साहात व शिस्तबद्धपणे साजरी झाली. मात्र, संचारबंदीचे पालन करण्याचा आग्रह केल्यामुळे रात्री नऊच्या सुमारास काही समाजकंटकांनी आंबेडकर पुतळा परिसरात पोलिसांच्या दिशेने दगडफेक केली. जयंती समितीचे पदाधिकारी, पोलिस यांच्या संयुक्त प्रयत्नामुळे परिस्थिती वेळीच नियंत्रणात आली. दगडफेकीत कोणी जखमी झाले नाही. शासनाने कोरोनाचे संकट असल्यामुळे काही नियम घालून दिले होते. त्याचे पालन करून पदाधिकाऱ्यांनी रात्री वेळीच कार्यक्रम आटोपते घेतले. सकाळपासून समाजबांधव दिवसभरात कुटुंबासह टप्प्याटप्प्याने येऊन अभिवादन करून निघून जात होती. अभिवादनासाठी येणाऱ्या समाजबांधवांना रात्री साडेआठनंतर जमावबंदीचे पालन करण्याचे आवाहन पोलिसांनी व जयंती उत्सव समितीने केले. समाजबांधवांनी त्यांना प्रतिसाद दिला. आपल्या वाहनाने व पायी ते घरी निघाले. पावणे नऊच्या सुमारास मोठा जमाव आंबेडकर पुतळ्याच्या दिशेने येत होता.

पोलिसांनी संचारबंदी व जमावबंदी असल्याने जमावाला माघारी फिरण्याची विनंती केली, त्यातील काही समाजकंटकांना राग आला. त्यांनी दगडफेक सुरू केल्याने घरी जाणाऱ्या समाजबांधवांमध्ये धावपळ उडाली. पोलिसांनी समाजकंटकांचा पाठलाग केला, ते सैरावैरा पळून गेले. शिवाजी पुतळ्यापर्यंत पोलिस आणि समाजकंटक यांच्यात संघर्ष सुरू होता. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण होते. सहाय्यक पोलिस आयुक्त समीर शेख, वरिष्ठ निरीक्षक सूरजकुमार बिजली यांनी जयंती समितीचे संयोजन समितीने सहकार्याने शांततेचे आवाहन केले. नाशिक रोड व उपनगर पोलिसांनी राज्य राखीव पोलिस दल, जयंती समितीचे पदाधिकाऱ्यांनी सयुंक्त मोहीम करत शांतता प्रस्थापित केली.

जयंतीचा कार्यक्रम करताना कोरोनाच्या निर्देशांचे उल्लंघन करीत जमाव जमला. यावेळी प्रचंड गर्दी झाल्याने कोरोना प्रसाराला अनुकुल स्थिती निर्माण झाली होती. त्याबाबत पोलिसांनी प्रमुख पदाधिकारी, नेते तसेच संयोजकांना वारंवार सूचना केली. त्यांना कोरोना प्रसाराचा धोका व शहरातील स्थितीची जाणीव करून दिली. मात्र जमाव मोठ्या संख्येने असल्याने व कोणीही निश्चित संयोजक नसल्याने गर्दी नियंत्रीत करणे हाताबाहेर गेले होते. 
....
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT