Sarkarnama Banner - 2021-05-06T131707.456.jpg
Sarkarnama Banner - 2021-05-06T131707.456.jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

बंद शाळांमध्ये वॉटर फिल्टर बसविण्याचा घाट..पिंपरी महापालिकेत भाजपचा अजब थाट..

उत्तम कुटे

पिंपरी :  सध्या कोरोनामुळे शाळा गेले वर्षभर बंद आहेत. पुढील दोन महिने त्या सुरु होण्याची शक्यता दिसत नाही. तरीही या बंद पालिका शाळांत अडीच कोटी रुपये खर्चून वॉटर फिल्टर व कूलर ते ही तातडीने बसविण्याचा प्रस्ताव (subject of water filter fitting in closed  school)भाजप सत्ताधारी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या pcmc स्थायी समितीच्या गेल्या बैठकीत (ता. २८) ठेवण्यात आला (subject put in standing committee)होता. तो दफ्तरी दाखल झाला. तरी, त्यामुळे विरोधकांच्या हाती भाजपवर सडकून टीका करण्याचे आयतेच कोलित मिळाले.  Criticism on BJP in pcmc water filter fitting in closed school

पालिकेच्या तिजोरीवर डल्ला मारण्याचा हा प्रकार फक्त टक्केवारीसाठी आणि ठेकेदार पोसण्यासाठी असल्याचा आरोप  राष्ट्रवादीने केला. नागरिकांना मृत्युच्या खाईत लोटून सत्ताधा-यांची कोट्यवधी रुपयांची ही खरेदी ठेकेदारांचे उखळ पांढरे करण्यासाठी आहे, असा हल्लाबोल भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी केला. भाजपचे पदाधिकारी आणि प्रशासनातले काही अधिकारी याव्दारे नागरिकांच्या कोट्यवधी रुपयांवर डल्ला मारत आहेत. कोविड परिस्थितीचं ते भान विसरले असल्याने ही खरेदी त्वरीत थांबिण्याचे आदेश द्यावेत. अपात्कालीन परिस्थितीत राज्य सरकारने दिलेल्या आर्थिक खरेदीच्या निर्बंधाचे उल्लंघन करून केलेल्या खरेदीतील दोषी अधिका-यांवर निलंबनाची कारवाई करावी,अशी मागणी लांडेंनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे. 

मोकळ्या मैदानात जंबो कोविड सेंटर उभारण्यावर टीका करताना लांडे म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खुल्या मैदानात कोविड सेंटर  उभारण्यापेक्षा पालिकेची नवीन रुग्णालये आणि मोकळ्या इमारतींमध्ये व्यवस्था करण्याचे आदेश आयुक्त राजेश पाटील यांना दिले होते. त्याला केराची टोपली दाखवून प्रशासनाकडून मोकळ्या जागेतच ती उभारली जात आहेत. भ्रष्टाचार करण्यासाठी सत्ताधा-यांचा हा सर्व खटाटोप सुरू आहे. खुल्या जागेवर कोविड सेंटर उभे केल्यास रुग्णांना पाऊस, वादळ, वारा याचा त्रास सहन करावा लागेल. याउलट दिघी येथील तालेरा कंपनीचे गोडाऊन सध्या उपलब्ध आहे.तेथे पाच हजार बेड्सची व्यवस्था होऊ शकते.ते ताब्यात घेतल्यास मोकळ्या जागेवर जम्बो कोविड सेंटर उभारण्यासाठी होणारा पालिकेचा करोडो रुपयांचा खर्च वाचेल. 

वॉटर फिल्टरच्या प्रस्तावासाठी अतिरिक्त आयुक्तांवर दबाव आणण्याचा प्रकार पालिकेच्या नावाला काळीमा फासणारा आहे, अशी टीका माजी विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक नाना काटे यांनीही केली. बंद शाळांसाठी वॉटर फिल्टरचा घाट म्हणजे पालिका तिजोरीवर शुद्ध डल्ला मारण्याचा प्रकार असून ठेकेदाराला पोसण्यासाठी तो घातला गेला आहे, असा आरोप त्यांनी केला. म्हणून हे काम प्रशासनाने करू नये, अशी मागणी त्यांनी आयुक्तांकडे केली. 

ते म्हणाले की कोरोना महामारीमुळे शहरातील शाळा बंद आहेत.तरीही महिला व बाल कल्याण समितीने‘वॉटर फिल्टर’खरेदीचा घाट घातला आहे. कोरोनामुळे शहरात दररोज शंभराच्या घरात मृत्यू होत असताना आरोग्य यंत्रणेवर पैसे खर्च करण्याची सध्या गरज आहे. शहरात मृत्युचे तांडव सुरू आहे. लस, रेमडीसीविर आणि ऑक्सिजनची कमतरता आहे. त्याच्या उपलब्धतेवर निधी खर्च करण्यास प्राधान्य  देण्याची सध्या नितांत गरज आहे.  कोरोनामुळे पालिकेचे उत्पन्न घटले आहे. त्यामुळे या संकटात शाळेत मुले नसताना सत्ताधारी पदाधिकाऱ्यांच्या मागणीला बळी न पडता करदात्यांच्या पैशाचा विनियोग विचारपूर्वक करावा, अशी विनंती काटे यांनी आयुक्तांना केली आहे. 

ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शहर कारभाऱ्यांच्या मतदारसंघातील दोन खुल्या मैदानात दोन जम्बो कोविड केअर सेंटर उभारण्यासही काटे यांनी विरोध केला आहे.  पावसाचे पाणी साठल्यामुळे गतवर्षी नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडियममधील जम्बो कोविड केअर सेंटर पावसाळ्यात दोन महिने बंद ठेवावे लागले होते,  याकडे त्यांनी आयुक्तांचे लक्ष वेधले आहे. त्यामुळे ही सेंटर पालकमंत्र्यांनी सांगितल्यानुसार पालिकेच्या मोठ्या मोकळ्या इमारतीत सुरु करण्याची मागणी काटे यांनीही केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT