Dada Bhuse Appeals Power loom owners not to ignore laborers
Dada Bhuse Appeals Power loom owners not to ignore laborers 
मुख्य बातम्या मोबाईल

कृषीमंत्री दादा भुसे म्हणतात....कोरोना अन्‌ पडत्या काळात मजूरांना वाऱ्यावर सोडू नका'

गोकुळ खैरनार

मालेगाव : शहरात मोठ्या प्रमाणात यंत्रमागावर राबणारा मजूर आहे. यातील सर्वाधिक मजूर हे स्थानिक आहेत. त्यांचा संपूर्ण उदरनिर्वाह मजुरीवर अवलंबून आहे. वर्षभर त्यांच्या जीवावर व्यवसाय करणाऱ्यांनी सध्याचा कोरोना आणि पडत्या काळात त्यांना वाऱ्यावर सोडून चालणार नाही. पॉवरलूम मालक आणि व्यापाऱ्यांनी त्यांना मदतीचा हात द्यावा. त्यांची काळजी घ्यावी, असे आवाहन कृषीमंत्री दादा भुसे यांनी केले. 

येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या पॉवरलूम मालक, व्यापारी व कामगार प्रतिनिधींची बैठक झाली. यावेळी पॉवरलूम मालक, व्यापाऱ्यांची समिती गठीत करण्याचे ठरले. या समितीमार्फत मजूरांच्या अडचणी सोडविण्यासाठी सर्वांनी सकारात्मकता व पाठींबा दर्शविला. रमजान हा महिना जकात वाटपाचा असल्यामुळे त्याची चांगल्या प्रकारे अंमलबजावणी होईल असा सूर या बैठकीत उमटला. यावेळी पॉवरलूम चालकांनी विविध विषयांवर माहिती दिली. सध्या शहरातील बहुतांश पॉवरलूम लॉकडाऊन आणि संचारबंदीमुळे बंद आहेत. त्याचे काटेकोर पालन केले जाईल. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने चिंता व्यक्त करुन यासंदर्भात प्रशासनाला सर्व प्रकारचे सहकार्य केले जाईल असे आश्‍वासन व्यापाऱ्यांनी दिले. 

सुविधांची केली पाहणी

या बैठकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी शहरातील सुविधांची पाहणी केली. श्री. मांढरे यांनी शहरातील कॅन्सर रुग्णालयाची पहाणी केली. त्याठिकाणी असलेल्या अतीदक्षता विभागासह रुग्णांच्या विलगीकरणासाठी आवश्‍यक सुविधांची माहिती घेतली. त्याठिकाणी उपलब्ध असलेली साधनसामग्रीची पहाणी करुन व्हॅंटिलेटरची सुविधा तत्काळ कार्यान्वित करण्यासाठी संबंधितांना सुचना केल्या. सहारा रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या, रुग्णालयातील वरच्या मजल्यावर रुग्णांना विलगीकरणासाठी आवश्‍यक असलेल्या मोकळ्या जागेतील सुविधांचीही पाहणी केली.

या सुविधांची उपयुक्तता, करावयाच्या सोयी सुविधांबाबत महानगरपालिका प्रशासनाशी चर्चा केली. ही रुग्णालये तात्काळ कार्यान्वित करण्याचे निर्देशही देण्यात आले. शहरातील पश्‍चिम भागातील 'मसगा' महाविद्यालयात साकारलेल्या कोविड केअर सेंटर आणि डेडीकेटेड कोविड सेंटर्सला देखील त्यांनी भेट दिली. रुग्णांना पुरविण्यात येणाऱ्या सुविधांचा आढावा घेतला. येथील परिचारीकांची विचारपूस केली. तेथील नोंदी तपासून दैनंदिन कामकाजाविषयी माहिती घेतली.

रुग्णांची तक्रार असल्यास संबंधितांवर जबाबदारी

मास्क, सॅनिटायझर्स तसेच रुग्णालयातील स्वच्छता, रुग्णांना पुरविण्यात येणारा आहार, पिण्याच्या पाण्यासह आवश्‍यक सोयी सुविधा अशा बारीक सारीत तपशील त्यांनी घेतला. उपाययोजनांबाबत सर्वाधिकार स्थानिक स्तरावर दिले आहेत. त्यानंतरही सुविधांबाबत रुग्णांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. ही अत्यंत खेदाची बाब आहे. यापुढे रुग्णांच्या तक्रारी आल्यास संबंधितावर जबाबदारी निश्‍चित केली जाईल. असे श्री. मांढरे यांनी सांगीतले. 

यावेळी सहायक जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, महापालिका आयुक्त त्र्यंबक कासार, उपायुक्त नितीन कापडणीस, अप्पर जिल्हाधिकारी धनंजय निकम, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा, तहसिलदार चंद्रजीत राजपूत आदि उपस्थित होते. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT